धुळे विकास सहकारी बँकेची 2 कोटीत फसवणूक
स्थानिक बातम्या

धुळे विकास सहकारी बँकेची 2 कोटीत फसवणूक

Balvant Gaikwad

धुळे –  धुळे विकास सहकारी बँकेच्या ॲक्सिस बँकेतील आरटीजीएस आणि एनइएफटी प्रकारचे खात्यातून परस्पर २,०६,५०,१६५ रुपये खातेधारक आणि बँकेच्या खात्यावर वर्ग करुन बँकेची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली.

हा प्रकार काल सकाळी सात ते सव्वा दहा वाजे दरम्यान अवघ्या साडेतीन तासात घडला. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत ॲक्सिस बँकेचे शाखाधिकारी धनेश नामदेव सगळे (वय ४1 रा. ६, रविराज विहार अपार्टमेंट, जगताप नगर,उंटवाडी नाशिक हमु १, साईश्रध्दा अपार्टमेंट, वृंदावन कॉलनी, दत्तमंदीर, देवपुर धुळे) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

त्यानुसार धुळे विकास सहकारी बँकेचे ॲक्सिस बँकेत आरटीजीएस आणि एनइएफटी प्रकारचे व्यवहार करण्यासाठी खाते आहे.

अज्ञात इसमाने ॲक्सिस बँकेची सीस्टीम हैक करुन ॲक्सिस बँकेचा डाटा चोरी करुन कोणीतरी अज्ञात इसमाने फसवणुक करण्याच्या उददेशाने बेकायदेशिर व्यवहार करुन धुळे विकास सहकारी बँकेच्या ॲक्सिस बँकेत आरटीजीएस आणि एनईएफटी प्रकारचे व्यवहार करणेकामी असलेल्या चालु खाते क्र ११४०२०००८२०६४०६ मधील २,०६,५०,१६५ रुपये वरील खातेधारक आणि बँकेच्या खात्यावर आरटीजीएस आणि एनईएफटी प्रकारचे व्यवहारामार्फत परस्पर वर्ग करुन बँकेची फसवणुक केली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाने विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com