धुळे : ३६ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

धुळे : ३६ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

शहरातील मोहम्मदीया नगरातील 35 वर्षीय तरूणाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 26 झाली आहे.

दरम्यान आज सायंकाळी जिल्ह्यात 36 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिरपूरातील 7, शिंदखेडा 2, साक्री 9 तर धुळे शहरातील 18 रूग्णांचा समावेश आहे. संध्याकाळी उशिरा आलेल्या अहवालात सापडलेल्या 8 पॉझिटिव्ह रुग्णांमधील 7 रुग्ण हे साक्री येथील कासार गल्लीतील असून 1 रुग्ण दक्षता नगर (धुळे) या परिसरातील आहे. लॉकडाऊननंतर काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने अनेक ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढले असून रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

दररोज वाढणार्‍या रूग्ण संख्येमुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 294 वर पोहोचली आहे. एकीकडे रूग्ण संख्या वाढत असली तरी बरे होणार्‍यांची संख्या देखील चांगली आहे. एकुण 130 रूग्णांची कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान आज सकाळी नाशिक येथे उपचार घेत असलेल्या दोंडाईचा आणि साक्रीतील एक-एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर सायंकाळी शिरपूरातील 5 जण त्यात 1 पुरूष व 1 महिला हे जुने टेलीफोन ऑफिस जवळ, 1 पुरूष गणेश कॉलनी, 1 शिल्पी गल्ली (मयत पुरूष) व मोहम्मदीया चौकात 1 एकाचा समावेश आहे. तसेच धुळ्यातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची कोरोना बाधितांची रूग्ण संख्या 315 वर पोहोचली आहे.

तसेच आज धुळे शहरातील मोहम्मदी नगरातील 35 वर्षीय तरूणाच कोरोने मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया उपचार सुरू होते. रात्री 10 वाजता आलेल्या अहवालामुळे आकड्यांचा स्फोट होऊन तो एकाच दिवसात 36 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com