देशदूत संवाद कट्टा : शॉर्ट फिल्म निर्मीतीच्या विविध घटकांवर मान्यवरांनी टाकला प्रकाश
स्थानिक बातम्या

देशदूत संवाद कट्टा : शॉर्ट फिल्म निर्मीतीच्या विविध घटकांवर मान्यवरांनी टाकला प्रकाश

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

समाजाचे मन:स्वास्थ्य जाणण्याचे प्रभावी माध्यम शॉर्टफिल्म

नाशिक | प्रतिनिधी

या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाजाचे मन:स्वास्थ्य जाणणे महत्वाचे आहे. या माध्यमाची ताकद खूप जास्त आहे. यात कथानक संवादापेक्षाही चित्रीकरणच बरेच काही सांगत असते. या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आपला संदेश पोहोचवणे महत्वाचे आहे.आज लोकांना आपले अधिकार व कर्तव्य यांचे भान नाही. त्यांना मतदानाचा ‘अधिकार’ असल्याचे सांगावे लागते.मुलभूत गोष्टींत लोक कर्तव्याला विसरतात. रस्ते पाण्याने धूवणे, झाडे उपटून फेकणे, मोबाईल हाती आले मात्र भान अद्याप आलेले नाही. या माध्यमातून सामाजिक भान जागृत करण्याचा उपक्रम अतिशय सूंदर असल्याचे मत मान्यवरांनी मांडले.

दै. देशदूतच्या वतीने आयोजित ‘शॉर्ट फिल्प मेकिंग व त्यांचे परिणाम’ या विषयावरील संवाद कट्टात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी चित्रपट निर्माते सुहास भोसले, वास्तू विशारद व चित्रपटाचे अभ्यासक जयेश आपटे, सायबर एक्स्पर्ट व चित्रपट कथा लेखक परेश चिटणिस, बासरी वादक व संगित अभ्यासक मोहन उपासनी व दै. देशदूतच्या कार्यकारी सपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी झालेल्या चर्चेत या बदलत्या काळात मुलांच्या हाती मोबाईलच्या माध्यमातून अकाली मोठ्या प्रमाणात जगाचे ज्ञान आले आहे. त्याला दिशा देण्याची गरज आहे. मुलांमध्ये छोट्या पडद्यापेक्षा मोबाईलवर चित्रपट पाहण्याची आवड असते. युवकांच्या याच सवयीला दिशा देण्याचा प्रयत्न दै. देशदूतच्या माध्यमातून केला जात असून, या साधनांचा वापर सामाजिक भान जनजागृत करण्याकडे नेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्थरावरील 50 सेकंदाचे ‘शॉर्ट फिल्म फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे.

यात फिल्मची लांबी जास्त ठेवण्यापेक्षा त्यातील आशय समर्थपणे मोजक्याच शब्दात मांडणे महत्वाचे ठरणार आहे. चित्रपटाच्या निर्मीतीत आवाजाला मोठे महत्व आहे. शुटींग दरम्यान परिसरातून येणारे नैसर्गिक आवाजही टिपण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातून जिवंतपणा येईल.कोणत्याही शॉर्ट फिल्ममध्ये आवाज व व्हिज्यअल्स स्मरणात राहतात. त्या दृटीने प्रयत्न होणे महत्वाचे आहे. शॉर्ट फिल्मच्या सूरूवात शेवट व मध्य यातून सांगितलेल्या गोष्टीसोबत दिला जाणारा संदेश महत्वाचे असतो.

या सगळ्या प्रयत्नांतून क्रिएटीव्हीटीला चालना मिळते. फॅशन म्हणून करीअरकडे वळणार्‍यांसाठी शॉर्ट फिल्म हे जिवन जगण्याची पध्दत व स्वतकडे पाहाण्याचा दृष्टीकोन देणार ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. चित्रपट हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून जनसामान्यांच्या मनावर परिणाम करण सहज शक्य आहे. त्यात 50 सेकंदात तो भाव पोहोचवणे यात मोठे क्रिएशन असून त्याचा वापर समाज प्रबोधनासाठी प्रभावीपणे करता येऊ शकतो.या बाबतचा दै. देशदूतचा प्रयत्न निश्चितच कल्पक असल्याचे सूर मान्यवरांच्या चर्चेतून उमटला.

Deshdoot
www.deshdoot.com