Video : देशदूत संवाद कट्टा : प्रजासत्ताक दिन विशेष

jalgaon-digital
1 Min Read

सहभाग – संवाद कट्टा’  जळगाव येथील मु.जे.महाविद्यालयाचे प्रा.देवेंद्र इंगळे व साहित्तीक जयसिंग वाघ

जळगाव –

रविवार दि.२६ जानेवारी २०२० रोजी आपण ७० वा प्रजासत्ताकदिन साजरा करणार आहोत. भारताची राज्यघटना दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. यानिमित्ताने प्रत्येकवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा होत असतो.

दि.२६ जानेवारी १९५० पासून संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेतील मुलतत्त्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी, घटनेतील ‘न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता’ ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय व्हावा यासाठी आज दि.२४ जानेवारी २०२० रोजी च्या ‘देशदूत संवाद कट्टा’  ‘देशदूत फेसबुक लाईव्ह’ या कार्यक्रमात ‘२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन विशेष’ यावर चर्चा करण्यासाठी जळगाव येथील मु.जे.महाविद्यालयाचे प्रा.देवेंद्र इंगळे व साहित्तीक जयसिंग वाघ सहभागी आहेत.

बघत रहा ‘देशदूतचा फेसबुक लाईव्ह’ संवाद कट्टा….

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *