Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदेशदूत संवाद कट्टा : सिव्हीक सेन्स पाळा; ‘करोना’चा धोका टाळा : तज्ज्ञ...

देशदूत संवाद कट्टा : सिव्हीक सेन्स पाळा; ‘करोना’चा धोका टाळा : तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले मत

नाशिक । प्रतिनिधी

चीनमध्ये करोना या रोगाने धुमाकूळ घातला असून तो जगातील 30 देशांमध्ये पसरला आहे. स्वाईन फ्ल्यू प्रमाणे हा संसर्गजन्य रोग असून त्याचा फैलाव तीव्रतेने होत आहे. भारतात देखील हा रोग शिरकाव करण्याचा धोका असला तरी घाबरण्याचे कारण नाही. या रोगाची लागण झाल्यास घाबरुन न जाता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावे. करोना हा संसर्गजन्य रोग असून नागरिकांनी सामाजिक ठिकाणी सिव्हीक सेन्स पाळल्यास या रोगाला अटकाव करणे सहज शक्य असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले.

- Advertisement -

शनिवारी (दि.22) देशदूत संवाद कट्ट्यात ‘करोना व्हायरस व समज गैरसमज’ या विषयावर डॉ.वैभव पाटील, डॉ.शाम अष्टेकर, डॉ.शब्बीर अबुजीवाला, डॉ.मेधा उपासनी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी करोना व्हायरसची लागण कशी होते, रुग्णांने कोणते उपचार घ्यावे, या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी काय करावे, याबाबत चर्चा करुन सल्ला दिला. सर्दी, खोकला, ताप, पोटात दुखणे आदी संसर्गजन्य रोगांप्रमाणे केरोनाची ही प्राथमिक लक्षणे आहेत. थंड हवामान या रोगासाठी पोषक असून त्यामुळे चीनमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. भारतात सध्या उन्हाळा सुरु असून त्याचा फैलाव होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे.

मात्र, केरळमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. इतर रोगांचे व्हायरस हे साधाणत: 48 तास जिवंत असतात. मात्र, करोनाचा व्हायसर नऊ दिवस जिवंत असतो. त्यामुळे त्याची साथ पसरण्याचा धोका जास्त असतो. करोनाची लागण झाल्यास घाबरुन जाऊ नये व मुख्य म्हणजे अफवांवर विश्वास ठेऊ नये. अशा वेळी रुग्णांनी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून सल्ला घेऊन औषध उपचार केले पाहिजे. प्रामुख्याने हा संसर्गजन्य रोग असल्याने हॅण्ड शेक करणे टाळणे, शिंकतांना तोंडाला रुमाल लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये हे सामाजिक नियम पाळल्यास करोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळता येईल.

तसेच, हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क लावणे हे उपाय केले पाहिजे. करोना या व्हायरसवर सध्यां तरी कोणतेही औषध नाही. एखाद्या व्हायसरवर प्रतिबंधात्मक औषध तयार करण्यासाठी वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागतोे. सार्स, स्वाईन फ्ल्यू या रोगांवरील औषधांद्वारे करोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. डॉक्टांकडून त्यावर रिसर्चकरुन औषध तयार केले जात आहे. सद्यस्थितीत संसर्गहोणार नाही याची काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बहुतांशी संसर्गजन्य रोग हे हातांद्वारे पसरतात. हॅण्ड शेक करण्याऐवजी भारतीय पध्दतीने नमस्कार करावा. आपल्याकडे प्रेत जाळून दहन केले जाते. त्यामुळे हा व्हायरस पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता असते.

– डॉ. वैभव पाटील

करोना सारख्या व्हायसरची लागण झाल्यास हॉस्पिटल ऐवजी शक्यतो घरीच उपचार घ्यावेत. जेणेकरुन इतरांना संसर्ग होणार नाही. एअर कंडिशनमुळे हवा बदल होत नाही. त्यामुळे केरोना व्हायरसचा फैलाव होऊ शकतो. सूर्यप्रकाशात ससंर्गजन्य विषाणू नष्ट होतात.

-डॉ. शाम अष्टेकर

करोना व्हायसरवर व्हॅक्सिन बनविण्याचे काम सुरु आहे. भारतामध्ये देखील हा रोग येऊ शकतो. मात्र, हा रोग मोठ्या प्रमाणात पसरु शकत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. शब्बीर अबुजीवाला

महिला व लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना केरोनाची लागण होण्याचा धोका जादा आहे. ते बघता सकस आहार व व्यायाम करुन शाररीक तंदुरुस्ती वाढवली पाहिजे. ग्रामीण भागात एनजीओंनी याबाबत काम करावे.

-डॉ. मेधा उपासणी

- Advertisment -

ताज्या बातम्या