Video : देशदूत संवाद कट्टा : ‘करोना’ नंतर वाहन उद्योगात नवीन संधी; मान्यवरांचा सूर
स्थानिक बातम्या

Video : देशदूत संवाद कट्टा : ‘करोना’ नंतर वाहन उद्योगात नवीन संधी; मान्यवरांचा सूर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

कोव्हीड-१९ नंतर निरोगी जीवनाला प्रत्येकजण प्राधान्य देणार आहे. सार्वजनिक वाहतूकीत दरवाढ होणार आहे. त्यामुळे खासगी वाहने घेण्याकडे लोकांचा कल वाढणार आहे. करोना जरी आपत्ती असली तरी त्याच्यासोबत जुळवून घेत वाहन उत्पादन कंपन्या, कर्जपूरवठादार संस्था  ग्राहकांनी गाड्या खरेदी करण्यासाठी नवीन योजना देत आहेत,  त्यामूळे वाहन उद्योगामध्ये नवीन संधी निर्माण होऊन ‘बिझनेस’ वाढणार असल्याचा सूर देशदूत संवाद कट्‌टयावर उमटला.

‘करोनानंतरचे ऑटोमोबाईल क्षेत्र’ या विषयावर आयोजित संवाद कट्‌ट्यामध्ये स्टर्लिंग मोटर्सचे समुह महाव्यवस्थापक महेश राठी, शिरोडे ह्युंदाईचे व्यवस्थापकीय संचालक गणेश शिरोडे आणि उन्नती व्हिएकल्सचे व्यवस्थापकीय संचालक एजाज काझी यांनी सहभाग घेतला.  ‘देशदूत’ च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले आणि महाव्यवस्थापक (जाहिरात) अमोल घावरे यांनी मान्यवरांशी संवाद साधला.
करोना नंतर सर्वत्र भितीचे वातावरण पसरले, मात्र हळूहळू ग्राहकांच्या मनातील भीती कमी होत आहे.

या काळात ग्राहक आणि  दालनातील सेवकांची आरोग्य सुरक्षितता अत्यंत महत्वाचा पैलू आहे, असे सांगून राठी म्हणाले, शासनाच्या शर्ती आणि अटी पाळून व्यवसाय सुरू झाला. साथीच्या रोगाने लोकांना ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ ने प्रवास करणे असुरक्षित वाटत असल्याने नवीन वाहनांची खरेदी करण्यांकडे लोकंचा कल वाढणार आहे. जे लोक सिटीबस अथवा ऑटोने कामावर जात होते ते आता दुचाकी खरेदी करतील तर दुचाकीधारक नवीन कार घेण्यास प्रवृत्त होत आहेत. एकूणच ऑटोमोबाईल व्यवसायात करोना आपत्तीमुळे नवीन संधी निर्माण होत आहेत.

संकटे, समस्या आणि आपत्ती येतात तिथे पर्यायी मागर्ही उघडतात, असे सांगून एजाज काझी म्हणाले, करोनानंतर अर्थव्यवस्था मंदावली, ग्राहकांच्या हातातील पैसाही कमी झाला मात्र गाड्यामध्ये करोनानंतर बदल संभवाणर असून निरोगीपणाचा मुद्दा अधिक ठळक झाल्याने लोकांना स्वत:च्या वाहनाशिवाय पर्याय नाही. अशा वेळी वाहन उत्पादन कंपन्या, कर्ज देणार्‍या बँका नवीन योजना ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत. वाहनासाठी र्कज घेतल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत हफ्ता न भरल्यास सूट देणे, कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन देणे यासह कंपन्याही नवीन योजना घेऊन येत आहेत. त्यामुळे वाहन उद्योगात पून्हा चैतन्य येणार आहे.

कोव्हीड-१९ शी दोन हात करायचे असे लोकांनी ठरवले आहे, त्यामुळे पाचव्या लॉकडाऊनमध्येही लोक सुरक्षेचे नियम पाळत खरेदीसाठी बाहेर पडत आहेत हा सकारत्मक संकेत असल्याचे सांगून गणेश शिरोडे म्हणाले, कार खरेदी करताना गाडीचा डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह या दोन गोष्टी सुरक्षित शारिरीक अंतर ठेऊन नवीन नियमाप्रमाणे देण्याचा प्रयत्न सर्वच जण पाळत आहेत. त्यासाठी शासनाचे दिशानिर्देश समोर ठेऊन आम्ही मास्क, थर्मल स्कॅनिंग, आरोग्यसेतू ऍप, यासह डिजीटल व्यवहारावर भर देत ग्राहकांना सर्वोच्च सुरक्षा देऊन सेवा देत आहोत.

वाहन खरेदीसाठी ग्राहकांना ‘टाटा फायनान्स’ तर्र्फे १००टक्के कर्ज देण्याची योजना जाहीर केली. गाडी खरेदीसाठी एक लाखासांठी ग्राहकांना १ हजार रुपये महिना इतका कमी हफ्ता सहा महिन्यापर्यंत देण्यात आला आहे, नंतर मासिक हफ्त्यांत वाढ केली जाईल जेणेकरुन ग्राहकांना अर्थनियाजन करण्यात अवधी मिळेल, अशी माहिती महेश राठी यांनी यंावेळी देण्यात आली.

मनुष्यबळ स्थिर

करोना टाळेबंदीनंतर अनेक कामगार, श्रमिकांनी स्थलांतर केले मात्र शहरातील वाहन डिलर्सकडे असणारा सेवकवर्ग प्रामुख्याने महाराष्ट्रातीलच आहे. त्यामुळे टाळेबंदीनंतर मनुष्यबळाचा प्रश्‍न उद्भवणार नसल्याचे मान्यवरांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com