Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेशदूत संवाद कट्टा : विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे

देशदूत संवाद कट्टा : विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला सामोरे जावे

सहभाग : नीलिमा पाटील, प्रदीपसिंग पाटील आणि खंडू जगताप

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

मुलांना परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवाचे आहे हे सध्या सर्वजण जणू विसरूनच गेले आहेत. विद्यार्थ्यांवर पालकदेखील एवढे मार्क मिळाले पाहिजे तेवढे मार्क्स मिळाले पाहिजेत असे सांगत असतात. अनेक विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता कमी असते त्यामुळे विद्यार्थी अनेकदा चुकीच्या मार्गाकडे वळतात. मात्र, विद्यार्थ्यांनी आगामी परीक्षांना न घाबरता निसंकोचपणे सामोरे जायला पाहिजे. तसेच आता संस्थेकडे विद्यार्थ्यांचे मार्क्स अधिक असल्यामुळे नापास होण्याची भीती अजिबातच बाळगू नये असा सूर देशदूतच्या संवाद कट्ट्यात उमटला. यावेळी शिक्षिका नीलिमा पाटील, प्रदीपसिंग पाटील तर पालकांची भूमिका मांडण्यासाठी देशदूतचे वरिष्ठ प्रतिनिधी खंडू जगताप उपस्थित होते.

यावेळी, परीक्षा पद्धती बदलली आहे, सोपी पद्धती सध्या अवलंबली जाते आहे. त्यामुळे कोन्हीही घाबरून जाऊ नये. या सर्व परिस्थितीत जरी विद्यार्थ्यांना अपयश आले तरीही यानंतर लगेचच पुरवणी परीक्षा होते त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्ष जाण्याची भीती असते तीदेखील आता राहिलेली नाही.

विद्यार्थ्यांच्या पुढील करियरच्या दृष्टीने पालकांना आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगले टक्के मिळवावेत अशी अपेक्षा असतेच. मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांवर अधिक दबाव न टाकता विद्यार्थ्यांना धीर देत त्यांच्या वेळेवेळी तब्बेतीची काळजी घेतली पाहिजे.

अनेकदा विद्यार्थी अभ्यासासाठी अधिकचा वेळ जागतात. यामुळे बऱ्याचदा ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्याची प्रकृती ढासळते. त्यामुळे हि बाबदेखील लक्षात घेतली पाहिजे.  मुलांनी काय केले पाहिजे हे मुलांवर सोपवले तर अधिक फायदा मुलांना होईल.

संपूर्ण संवाद कट्टा बघण्यासाठी इथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या