Video : ‘देशदूत’चे सामाजिक जनजागृती अभियान : ‘फ्रवशी’त अन्न नासाडीवर संवादकट्टा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

सामाजिक भान (सिव्हिक सेन्स) या विषयावर दैनिक देशदूतच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जनजागृती अभियान हाती घेण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात भारताच्या नव्या पिढीवर संस्कार होणे गरजेचे असल्याने जनजागृतीची सुरुवात लहान मुलांपासून करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दै. देशदूतद्वारे शहरातील फ्रावशी अकादमी स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत ‘अन्नाची नासाडी’ या विषयावर संवाद कट्ट्याचे आयोजन करणयात आले होते.

यावेळी देशदूतच्यावतीने मानसी केळकर व भाग्यश्री उमदी यांनी स्कूलच्या इ.6 वी तील विद्यार्थ्यांच्या समूहासोबत कट्ट्यात विविध सामाजिक जागरुकतेच्या विषयांवर चर्चा करुन त्यांची मते जाणून घेतली. यावेळी वर्गातील विद्यार्थ्यांनी या कट्ट्यादरम्यान प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध शंकांची उत्तरे सामजावून घेतलीे.

विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारताना वर्तमानपत्रांचे महत्व, चालू घडामोडींवर विद्यार्थ्यांचे वाचन व त्यांचा दृष्टीकोन याचा आढावा घेण्यात आला. तसेच वाचन कीती महत्वाचे आहे याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक भान जपणार आणि इतरांनादेखील जपण्यास सांगण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

खाद्य संस्कृतीबद्दल जागरुक राहताना त्यांचा अनावश्यक साठा करणे, कालांतराने ते कचर्‍यात फेकणे ताटात नको तेवढे वाढून घेणे, व उष्टे टाकून ते डस्टबीन मध्ये टाकणे यावर प्रत्येकाने जागरुकतेतून बंधने घालणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच जिथे कुठे काही चुकीचे होत असल्याचे दिसल्यास त्यास विरोध करून सामाजिक जाणीव लक्षात आणून देणार असल्याचा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांनी चर्चेत व्यक्त केला.

सामाजिक भान जपताना लग्नसोहळ्यात होणारी अन्नाची नासाडी, सामाजिक वर्तन, स्वच्छतेचा अभाव याबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील वाया जाणार्‍या अन्नावर बोलताना भूक लागेल तेव्हढेच अन्न ताटात वाढून घ्यावे, तसेच निमंत्रण असतील तेव्हढाच स्वयंपाक तयार करणे गरजेचा असल्याचे सांगितले. तसेच उरलेले अन्न स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजवंतांना त्याच वेळी वाटले गेले पाहिजे हॉटेल मध्ये अन्न उरत असल्यास ते पॅक करुन मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे गरजेचे असल्याच्या भावना मुलांनी मांडल्या.

यावेळी मुलांच्या विचारातील ‘सामाजिक भान’व त्याबाबतचे ज्ञान व जाणिवा ठळकपणे दिसून आल्या. कार्यक्रमाच्या सूरूवातीला प्राचार्या भानुमती यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सूत्रसंचालन करुन देशदूतचे आभार मानण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *