दिल्ली प्रवास, कोरोना बाधित क्षेत्राशी संबंध असलेल्या चार व्यक्तींनी साधला संवाद
स्थानिक बातम्या

दिल्ली प्रवास, कोरोना बाधित क्षेत्राशी संबंध असलेल्या चार व्यक्तींनी साधला संवाद

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

ज्या लोकांनी दिल्ली किंवा कोरोना बाधित क्षेत्राचा दौरा केला आहे, त्यांनी आपली, आपल्या मानवी संपर्काची व प्रवासाची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी असे आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील ४ व्यक्तिंनी प्रशासनाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून स्वत:बद्दलची माहिती दिली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, चार व्यक्तींनी हेल्पलाईनशी संपर्क साधला आहे, त्यांनी त्यांचा दिल्ली किंवा कोरोना बाधित क्षेत्राचा प्रवास उघड केला आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने घेतले जातील आणि अट घालून त्यांना घरी किंवा सरकारी रूग्णालयात क्वारंटाइन करण्यात येईल.

अजूनही वेळ गेलेली नाही, कोरोना बाधित क्षेत्र अथवा दिल्लीचा प्रवास केलेल्या नागरीकांनी आपली माहिती प्रशासनास द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com