जळगावातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

जळगावातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू

Balvant Gaikwad

जळगाव –

बुधवारी कोरोना पॉझिटीव्हचा अहवाल आलेल्या जळगावातील ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू गुरुवारी दुपारी झाला. त्यास श्‍वास घेण्यास अधिक त्रास व्हायचा व्हायचा, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

हा रुग्ण काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा संशयित म्हणून दाखल करण्यात आला होता. परंतु, त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या कुटुंबीयांसह संपर्कातील १५ व इतर चार संशयितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या लाळीचे नमुने घेवून ते धुळे येथील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

तर या अगोदर आढळलेल्या एका पॉझिटीव्ह रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची तब्बेत स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com