Ctrl C आणि Ctrl V चा जनक हरपला; स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्सही यांनी घेतली होती प्रेरणा
स्थानिक बातम्या

Ctrl C आणि Ctrl V चा जनक हरपला; स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्सही यांनी घेतली होती प्रेरणा

Dinesh Sonawane

वृत्तसंस्था : 

संगणक वापरणे सहज सोप्पे व्हावे यासाठी १९७० च्या दशकात ज्याने कंट्रोल सी आणि कंट्रोल व्हीचा शोध लावला त्या लॅरी टेसलर या महान व्यक्तीने आज जगाचा निरोप घेतला. ७४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.   विशेष म्हणजे, अनेक बड्या कंपन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी टेसलर यांनी बजावली होती. एकेकाळी स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांनीही टेसलर यांची प्रेरणा घेऊन अनेक नवनवीन आवृत्त्या बाजारात आणल्या होत्या.

१९४५ साली न्यू यॉर्कमध्ये लॅरी यांचा जन्म झाला होता. त्यांनी स्टॅण्डफोर्ड येथे त्यांनी कंप्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. अनेक दिवस त्यांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयवर संशोधन केले. मराठीत याला कुत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जाते.

१९७३ साली कंप्युटर श्रेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या अॅलन के यांनी लॅरी यांना झेरॉक्स कंपनीच्या पॅलो ऑल्टो रिसर्च सेंटर (पीएआरसी) येथे नोकरीची संधी दिली होती.

पीएआरसीमध्येच लॅरी यांनी cut copy paste तंत्रज्ञानाचा शोध लावला. माहिती पुन्हा पुन्हा लिहिण्याऐवजी अगदी काही क्षणांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी हा पर्याय लॅरी यांनी शोधून काढला.

ग्राफिक युझर इंटरफेस आणि माऊसच्या हलचालींसंदर्भातील संशोधन आणि अभ्यासाठी पीएआरचे नाव घेतले जायचे. या अनेक संकल्पनाच्या मागे लॅरी यांनी कष्ट घेतले आहेत.

१९७९ साली झेरॉक्समध्ये काम करत असतानाच लॅरी अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्याबरोबर दिसू लागले. झेरॉक्समध्ये लॅरी करत असलेले काम पाहून स्टीव्ह यांनी लिसा आणि मॅक हे प्रोडक्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.

१९८० मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी लॅरी यांना अॅपलमध्ये नोकरी दिली. लॅरी हे मॉडललेस कंप्युटींगसाठीही प्रसिद्ध होते.  लॅरी यांनी १९९७ साली अॅपल कंपनी सोडली. त्यानंतर त्यांनी स्टेजकास्ट या स्टार्टअप कंपनीमध्ये काम केलं.

२००१ साली लॅरी यांनी अॅमेझॉन कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. ते इंजिनियरिंग विभागाचे उपाध्यक्ष होते. अॅमेझॉनला त्यांच्या वेबसाईटमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी लॅरी यांनी मदत केली.  २००५ साली लॅरी यांनी अॅमेझॉनमधील नोकरी सोडली आणि ते याहूमध्ये गेले.

Deshdoot
www.deshdoot.com