Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअमळनेरात सराईत गुन्हेगाराचा खून

अमळनेरात सराईत गुन्हेगाराचा खून

 अमळनेर – 

शहरातील कुख्यात सराईत गुन्हेगार राकेश चव्हाण याचा येथील ख्वाजा नगर भागात लाकडी दांडक्याने मारून खून झाल्याची घटना रात्री ८ चे सूमारास घडली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान राकेश चव्हाण यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला डझनभर  गुन्हे दाखल असून अंतर्गत गून्हेगारीतून हा खून झाला असावा असा अंदाज आहे सद्या तो दोन दिवसापूर्विच लातूर जेल मधून जामीनावर सूटला होता काही दिवसांपूर्वी त्याने अमळनेर रेल्वे स्टेशनला पोलीस चौकीवर हल्ला करून वाहन व चौकीचे नुकसान करून ८ ते ९ महीन्या पासुन फरार झाला होता .

तदनंतर भुसावळ येथे गावठी बंदूक सह पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली होती. तात्कालीन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदशनखाली सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी त्याला भुसावळ येथून ताब्यात घेऊन अटक केली होती.

सराईत गुन्हेगार राकेश वसंत चव्हाण याच्यावर अमळनेर पो.स्टे सह भुसावळ, नंदुरबार, ला त्याच्या विरुद्ध अजून इतर काही पो.स्टे ला गुन्हे दाखल होते .
तो अमळनेर पो.स्टे ला रेकार्ड वरील हिस्ट्रीशीटर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या