सन राईस हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा

सन राईस हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा

दोन तरूणीची सुटका; दोघांना घेतले ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहर पोलिसांनी बुधवारी रात्री वाकोडी फाटा येथील हॉटेल सन राईस येथे हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर धाड घालून दोन तरूणीची सुटका केली. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रकाश धनाजी सपकाळ (वय- 27 रा. सारसनगर, नगर), रामेश्वर आप्पासाहेब पाटील (वय- 27 रा. गंगापूर, औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

वाकोडी फाटा येथील सन राईस हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री सातच्या सुमारास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिटके तसेच पोलिस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, पोलीस हवालदार निपसे, पोलीस नाईक काळे, तागड, फसले, गागडे, जाधव, महिला पोलीस हवालदार गायकवाड, भगत यांच्या पथकाने सन राईस हॉटेल येथे छापा टाकला.

अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन मुलींची सुटका करून कुंटणखाना चालवणारे प्रकाश धनाजी सपकाळ व रामेश्वर आप्पासाहेब पाटील याचेवर स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 च्या कलमान्वये भिगार कॅम्प पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com