Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकगोविंदनगरमधील कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज; नाशिककरांनी सोडला सुटकेचा निश्वास

गोविंदनगरमधील कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज; नाशिककरांनी सोडला सुटकेचा निश्वास

नाशिक | प्रतिनिधी 

शहरातील गोविंद नगर येथील करोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या रुग्णाला शुभेच्छा देत निरोप दिला. काल (दि. १९) या रुग्णाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात लासलगाव पाठोपाठ गोविंद नगर येथील रुग्णालय योग्य उपचारांद्वारे बरे करण्यास आरोग्य विभागाला यश आल्यामुळे आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले जात आहे.

काही दिवसांपुर्वी नाशिक शहरातील पहिला करोना बाधित रुग्ण गोविंद नगर परिसरात आढळून आला होता. रेल्वे कंत्राटाच्या कामासंदर्भात आग्रा येथे गेलेल्या या रुग्णाला करण्याचा संसर्ग झाल्याचे आढळुन आले हाेते. त्यानंतर त्याच्यावर आरोग्य विभागाने तातडीने उपचार सुरू केले. १४ दिवसांचे उपचार घेतल्यानंतर या रुग्णाचे पंधराव्या आणि सोळाव्या अशा दोन्ही दिवसांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले होते.

प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांनी कोरोनाबाधित रुग्णांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. यामुळे हा रुग्ण आज कोरोनामुक्त झाला असून त्यास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णवाहिकेच्या समोर आरोग्य अधिकाऱ्यांनी येत टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातुन मुक्त कण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांकडून अभिनंदन

जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांनी योग्य पद्धतीने उपचार केल्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील दुसरा आणि शहरातील पहिला रुग्ण बरा झाला असून जिल्हाधिकारी मांढरे यांनी पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या