Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशकोरोना : अमेरिकेत आणीबाणी लागू

कोरोना : अमेरिकेत आणीबाणी लागू

वॉशिंग्टन : जगाला भयभित करणार्‍या कोरोना व्हायरसने जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेवर आणीबाणी लागू करण्याची वेळ आणली. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रपरिषदेत आणीबाणीची घोषणा केली.

जगभर वेगाने पसरणार्‍या कोरोनाने 117 देशांत शिरकाव केला आहे. लाखांवर जणांना बाधा तर 5 हजारांवर मृत्यू झाले आहेत. चीननंतर इटलीत सर्वाधिक जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोलाला महामारी म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेत हजार रूग्ण कोरोना बाधीत आहेत. 37 जणांचा मृत्यू झाला आहे. आधीच युरोपातून अमेरिकेत प्रवेशाला 30 दिवसांची बंदी घातली होती. आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अमेरिकेत आणीबाणी जारी करण्यात आली आहे.

भारतात दुसरा बळी
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा दुसरा बळी दिल्लीत नोंदविला गेला. कोरोनाची लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दिल्ली येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वी स्वित्झर्लंड येथून परतला होता. त्याच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली. चार दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा देशात कोरोनाचा दुसरा बळी ठरला. त्याआधी कर्नाटकमध्ये गुरूवारी वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या