मुंबईतील कोरोना पाझिटिव्ह रुग्णसंख्या वाढली; धारावी व माहीममध्ये चार रुग्ण सापडले
स्थानिक बातम्या

मुंबईतील कोरोना पाझिटिव्ह रुग्णसंख्या वाढली; धारावी व माहीममध्ये चार रुग्ण सापडले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे. धारावीतील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आजही धारावीत करोनाचे दोन रुग्ण आढळले असून धारावीतील करोना रुग्णांची संख्या नऊ वर पोहोचली आहे.

तर, धारावीपाठोपाठ माहीममध्ये पहिल्यांदाच करोनाचे दोन रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धारावीतील दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या आणि धारावीच्या बाजूलाच असलेल्या माहीममध्येही करोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढले आहे.

मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५०० च्या वर पोहचला असून त्यात वरळी परिसरात सर्वाधिक ७८ रुग्ण आहेत.  कुलाबा व मशिद बंदर परिसरात पाच ते सहा रुग्ण आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com