Saturday, April 27, 2024
Homeनाशिककाळजी नसावी; नाशिक सिव्हीलमधील इराणचा रुग्णही करोना ‘निगेटिव्ह’

काळजी नसावी; नाशिक सिव्हीलमधील इराणचा रुग्णही करोना ‘निगेटिव्ह’

नाशिक | प्रतिनिधी 

इराणहून आलेल्या एका व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. या व्यक्तीने सर्दी व ताप आल्याची तक्रार केल्याने त्यास दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. दरम्यान, या रुग्णाचीही चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात इटलीहून आलेल्या विद्यार्थ्यावर देखील जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून उपचार करण्यात आले होते. मात्र त्याच्या वैद्यकीय अहवालात कोरोना नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास घरी सोडण्यात आले. चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाचा विळखा बसला आहे.

त्यात इटली व इराण या देशांचाही समावेश आहे. त्यामुळे या देशांमधून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार इराण देशातून तीघे नुकतेच नाशिकला आले आहेत.

या तिघांची मनपा वैद्यकीय विभागातर्फे तपासणी करण्यात आली. त्यात ३५ वर्षीय व्यक्तीने सर्दी व ताप आल्याची तक्रार केली. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने या व्यक्तीस दाखल करण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरु असून रात्री किंवा बुधवारी (दि.४) त्यांचा वैद्यकीय अहवाल येण्याची शक्यता आहे.

खबरदारी म्हणून या व्यक्तीस दाखल करण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय विभाग नियमीत १४ दिवस तपासणी करीत आहे. कोणी तक्रार केल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहे.

डॉ. निखील सैंदाणे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक 

- Advertisment -

ताज्या बातम्या