Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक : फिल्डवर असलेल्या पत्रकारांची होणार कोरोनाची तपासणी

नाशिक : फिल्डवर असलेल्या पत्रकारांची होणार कोरोनाची तपासणी

नाशिक | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राज्यातील जनतेला कोरोनाशी संबंधित बातम्या देणाऱ्या मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी फिल्डवर काम करणाऱ्या नाशिकमधील पत्रकारांची देखील तातडीने तपासणी करण्यात यावी यासाठी विशेष तपासणी कॅम्प घ्यावा असे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले आहे. आज ना.छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तपासणी कॅम्प घेण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या संकटाची चाहूल लागल्यापासून काही माध्यमातील पत्रकार आजही फिल्डवर आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.खबरदारी म्हणून मुंबईतील फिल्डवर काम करणारे पत्रकार,फोटोग्राफर,व्हिडिओग्राफर यांची राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. विविध माध्यमात कार्यरत असणा-या एकूण १६७ पत्रकारांची गेल्या गुरूवारी कोरोना चाचणी करण्यात आली.त्यातील५३ पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर नाशिमध्ये फिल्डवर काम करणारे पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर यांच्यासाठी तातडीने विशेष तपासणी कॅम्प घेऊन सर्वांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना ना.छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच पत्रकारांसाठी तपासणी कॅम्प घेतला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या