नाशिक जिल्ह्यात नवे ४५ कोरोना संशयित दाखल; मालेगावमधून सर्वाधिक ३५ संशयित
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात नवे ४५ कोरोना संशयित दाखल; मालेगावमधून सर्वाधिक ३५ संशयित

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज नवे ४५ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३५ रुग्ण मालेगावात ताब्यात घेण्यात आले आहे. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  तर नाशिकमधून दहा नवे रुग्ण संशयित आढळून आले आहेत. तसेच अद्याप ९० संशयित रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत आतापर्यन ३७० जणांचे घशाचे नमुने घेण्यात आले असून यापैंकी २७३ नमुने निगेटिव्ह आले आहेत तर सात रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. यात एका रुग्णाचा मालेगावी काल मृत्यू झाला असून नाशिकमध्ये दोन तर मालेगावात चार रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर अतापार्यात्न ९० संशयितांचे नमुने प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरील देशातून जवळपास ८८९  नागरिक आले असून त्यापैंकी ५९५  नागरिकांचे १४ दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. आज एकूण २९४ जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

नाशिक मध्ये आज नवीन एकूण ४५ रुग्ण दाखल झाले असून यात नाशिक जिल्हा रुग्णालयात सात, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात ३५ तर कठडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ०३ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

या रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उदया सायंकाळपर्यंत या रुग्णांचे अहवाल मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील २१ रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहेत तर मालेगाव सामान्य रुग्णालयातील ४३  आणि  डॉ झाकीर हुसेन रुग्णालयातील २६ असे एकूण ९० संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com