Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकोरोना संशयित महिलेचा मृत्यू

कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

नवीन 14 रुग्ण दाखल; संशयितात दोन बाळांचाही समावेश

जळगाव –

जिल्हा रुग्णालयातील कोरोना संशयित 50 वर्षीय महिलेचा गुरुवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या स्वॅबचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

- Advertisement -

या रुग्णालयात गुरुवारी कोरोना संशयित नवीन 14 रुग्ण दाखल झाले. यातील 8 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून ते औरंगाबादला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

संशयित रुग्णात तीन ते पाच महिन्याच्या दोन बाळांचा देखील समावेश आहे. धरणगाव तालुक्यातील कोरोना संशयित रुग्ण महिलेस मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिला न्युमोनिया, डायबेटीस, रक्तदाब, श्वसनविकार आदी त्रास होता. या महिलेची ट्रॅव्हल व कॉन्टॅक्ट हिस्ट्री नाही. परंतु, कोरोनासंदर्भातील काही लक्षणेही आढळल्याने त्या महिलेचे स्वॅब घेण्यात आले.

तिच्या मृत्यूचे कारण अहवालानंतरच स्पष्ट होईल. त्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच या महिलेची मृतदेह प्लास्टिकच्या मोठ्या पिशवित पॅक करण्यात आला. त्यानंतर अंत्यविधीबाबत योग्य त्या सूचना अधिकार्‍यांनी नातेवाईकांना दिल्या.

‘त्या’ महिलेचा अहवाल निगेटीव्ह

या रुग्णालयात पिंप्राळ्यातील एका 60 वर्षीय महिलेस श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला सोमवारी दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल केले होत. तिचा सोमवारी सायंकाळीच मृत्यू झाला. या महिलेचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे.

दरम्यान, या अगोदर दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील मेहरुणमधील पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर सालारनगरातील पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 186 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातील 176 अहवाल निगेटीव्ह आले. यातील दोन नमुने नाकारण्यात आले आहे. तर उर्वरित अहवाल प्रतीक्षेत आहेत.

आतापर्यंत 122 रुग्णांना होम क्वॉरंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत गुरुवारी 117 रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले.तर आतापर्यंत 3127 रुग्णांचे स्क्रिनिंग झाले आहे.

स्वॅबची तपासणी औरंगाबादला जळगावातील रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रारंभी पुण्याला घेवून जावे लागत होते. पुण्यातील प्रयोगशाळेत स्वॅबची संख्या वाढली. त्यामुळे धुळे येथील प्रयोगशाळेतील स्वॅब तपासणीची सोय झाली. धुळ्यात हे काम बरेच दिवस सुरू होते.

पंरतु, धुळ्यातील प्रयोगशाळेमधील किट संपल्यामुळे आता जळगावातील स्वॅब तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागत आहेत. तेथील वाढत्या स्वॅबच्या संख्येमुळे जळगावातील अहवाल येण्यास विलंब होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या