Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकोरोना संशयित आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू

कोरोना संशयित आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू

जळगाव – 

जिल्हा रुग्णालयातील कोरोना संशयित ६८ वर्षांच्या सुप्रीम कॉलनीतील एका वृद्ध महिलेचा ११ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या महिलेचा मृतदेह विशिष्ट प्लास्टीकच्या मोठ्या बॅगमध्ये पॅक करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करीत या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या ६८ वर्षीय संशयित वृद्ध महिलेस १० रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला बर्‍याच दिवसांपासून दम्याचा आजार होता. न्युमोनिया असल्यामुळे श्‍वास घेण्यासही त्रास व्हायचा. या महिलेचा ११ रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा स्वॅब घेवून तो धुळ्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. परंतु, अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

जिल्हा रुग्णालयात ११ रोजी सायंकाळपर्यंत कोरोना संशयित १३ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर संशयित १५ रुग्णांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संशयित ३१ रुग्णांचे अहवाल  प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यातील मेहरुणमधील एका रुग्णावर उपचार सुरू आहे.

त्याचा दुसर्‍या टप्प्यातील स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. तर सालारनगरातील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत २११ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील १८२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर नमुने नाकारण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या