Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक : काल रात्री आढळून आलेल्या १२ करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची अशी आहे...

नाशिक : काल रात्री आढळून आलेल्या १२ करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची अशी आहे हिस्ट्री

नाशिक महापालिकेच्या हद्दीत काल रात्री आणखी १२ रुग्णांची भर पडली. यामुळे रुग्णसंख्या वाढून २३४ वर पोहोचली आहे. शहरातील आतापर्यंत ८१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सध्या १४३ रुग्णांवर उपचार शहरातील विविध दवाखान्यांमध्ये सुरु आहेत.  रुग्णसंख्या वाढल्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढली आहे. आजपर्यंत शहरात ५३ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. याठिकाणी मनपाच्या आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आणि करोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची तपासणी सुरु आहे. नाशिक शहरात आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे हिस्ट्री

- Advertisement -

कृषी नगर पंडित पार्क येथील ५१ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. ही व्यक्ती मुंबई येथून प्रवास करून आलेली आहे. या व्यक्तीला स्थानबंद्ध करण्यात आले होते. दुसरी  व्यक्ती ओंकार नगर पेठरोड येथील ४५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती आधीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील असल्याचे समजते.

जुन्या नाशिकमधील काझीपुरा  येथील १६ वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला आहे. बागवान पुरा, नाशिक येथील १२ वर्षीय मुलगी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.  ३ वर्षीय बालिका रा.पाटील पार्क, नाशिक हीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

काझी पुरा येथील ३२ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत आहे.तर  शिंगाडा तलाव येथील २९ वर्षीय महिला व १५ वर्षीय कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

वडाळा गाव येथील ५० वर्षीय महिला २६ वर्षीय २ युवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.  पंचशील नगर येथील ३० वर्षीय महिला यांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आलेला आहे.बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या १२ रुग्णापैकी केवळ मुंबईहून आलेला हा रुग्ण नवीन रुग्ण आहे. तर इतर अकरा रुग्ण हे जुन्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.

यातील काही रुग्णांवर कठडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या