आंबेदिंडोरीत करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ
स्थानिक बातम्या

आंबेदिंडोरीत करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

दिंडोरी । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी येथे करोनाचा रुग्ण  सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आंबेदिंडोरी-ढकांबे रस्त्यावरील रहिवाशी असलेल्या एका 60 वर्षीय रुग्णाला करोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या रुग्णाचा काही दिवसांपुर्वी दुचाकीवरुन अपघात झाला होता. त्याला नाशिक एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे त्यांचा एक्सरे काढल्नयानंतर फ्रॅक्‍चर असल्याचे समजले.

या रुग्णावर उपचार करण्याअगोदर खाजगी दवाखान्यात त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज प्राप्त झालेला अहवाल  पॉझिटिव्ह आलेला आहे.

काही दिवस हा रुग्ण रुग्णालयात तपासणीसाठी जाणे टाळत होता. या बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना विलगिकरण कक्षात हलवण्याची प्रक्रिया झाली आहे व त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

या व्यक्तीच्या गावातील बाधित रुग्णाच्या घरापासून जवळचा परिसर कंन्टेनमेंट झोन आणि बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणा आवश्यक उपाययोजना करत आहे.

बाधित रुग्णाचा परिसर व गाव यापुढे 14 दिवस संपूर्ण लॉकडाऊन राहिल. दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, तोंडाला माक्स  किंवा रुमाल बांधावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय  अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com