ओझरमध्येही करोनाचा शिरकाव

ओझरमध्येही करोनाचा शिरकाव

ओझर | वार्ताहर

जगाला आपल्या कवेत घेऊ पाहणाऱ्या करोनाचा शिरकाव आता ओझरमध्येही झाला आहे. मुंबईवारी करून आलेल्या एका व्यक्तीचा करोना अहवाल बाधित आढळून आला आहे. या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, ५४ वर्षीय व्यक्ती खासगी कामाच्या निमित्ताने मुंबई येथे गेले होते. इथून परत आल्यानंतर या व्यक्तीला सर्दी खोकल्या सह करोनाचे प्रथमदर्शनी लक्षण आढळून आल्याने त्याच्या घशातील स्वॅब चे नमुने घेण्यात आले होते.

त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. यानंतर ओझर मध्ये खळबळ उडाली दरम्यान आरोग्य यंत्रणेने सदर कोरोणा बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर नागरीकांची माहीती घेण्यास सुरवात केली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना गृहस्थानबद्ध करण्यात आले आहे.

आज एक रुग्ण बाधित आढळून आल्यामुळे ओझरला पुन्हा लाॅकडाऊन होणार आहे. नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच जान्हवी कदम यांनी दिली आहे. याकाळात नागरीकांनी घरा बाहेर पडु नये असे आवाहन ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com