नाशिक जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या ५५९ वर; ३८ पाॅझिटिव्ह, शहरात १३ तर मालेगावी २१ रुग्ण बाधित आढळले
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या ५५९ वर; ३८ पाॅझिटिव्ह, शहरात १३ तर मालेगावी २१ रुग्ण बाधित आढळले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये दोघे तर दिंडोरीतील इंदोरे गावातील एक रुग्ण बाधित

नाशिक । प्रतिनिधी 

नाशिक शहरात आज आणखी दहा रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२० अहवालात ३८ अहवाल बाधित आढळून आले आहेत. तर दोघांच्या दुसऱ्या चाचण्याही बाधित आढळल्या आहेत. यामध्ये २१ रुग्ण मालेगावमधील आहेत तर १३ रुग्ण नाशिक शहरातील आहेत. आजच्या अहवालात ग्रामीण भागातील दिंडोरीतील एक तर इतर दोघे निफाड तालुक्यातील विंचूर येथील आहेत.

आज जिल्ह्यात ४२० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये  ३८० निगेटिव्ह तर ३८ अहवाल अधीत आढळून आले आहेत. शिवाय दोन बाधित रुग्णांची दुसरी तपासणीही बाधित आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील चिंता अधिकच वाढली आहे. दोन वर्षीय सातपूरमधील तर मालेगावमधील दीड वर्षीय मुलीचा आज आलेल्या अहवालात समावेश आहे. तर एका ६ वर्षाच्या मुलाचाही अहवाल मालेगावी बाधित आढळून आला आहे. वाढलेल्या आकडेवारीमुळे नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या ५५९ वर पोहोचली आहे. यामध्ये नाशिक शहर ३९, मालेगाव शहरात ४४१ वर रुग्ण पोहोचले आहेत.

आज नाशिक शहरात आढळून आलेल्या १३ रुग्णांमध्ये ८ रुग्ण हे सातपूर कॉलनीतील आहेत. आधीच्या बाधित रुग्णाचे निकटवर्तीय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शहरातील नवीन सिडको, पाटील नगर, श्रीकृष्ण नगर, हिरावाडी आणि मालपाणी सफ्रोन या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.  या रुग्णांमध्ये बाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा समावेश असल्याचे समजते. तर एका फार्मासिस्टचाही यात समावेश आहे.

आतापर्यंत नाशिक ग्रामीणमधेय ६० रुग्ण आढळून आले असून यामध्ये दोघे पूर्णपणे दोघे बरे होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक मनपा क्षेत्रात ३९ रुग्ण आढळून आले असून तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

मालेगाव मनपामध्ये एकूण ४४१ रुग्ण आढळून आलेल असून यामध्ये ४१ पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत जिल्हा बाहेरील १९ रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com