Wednesday, April 24, 2024
Homeधुळेकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

कोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव  – 

जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित आणखी चार रुग्ण शनिवारी दाखल झाले आहेत. त्यांच्या लाळीचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती शासकीय

- Advertisement -

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत कोरोना संशयित २० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ११ रुग्णांच्या लाळीच्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. निकषात न आल्याने दोन रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीची आवश्यकता भासली नाही.

सध्या सात रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहे.  जिल्हा रुग्णालयात शनिवारी दाखल झालेल्या कोरोना संशयित चार रुग्णांमध्ये २८ ते ३४ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. यात एक तरुण जळगावातील आहे. तो जर्मनीहून १७ रोजी घरी परतला. दुसरा तरुण सावखेडा येथील असून तो बर्लिनहून १७ रोजी घरी आला. तिसरा तरुण म्हसावद येथील असून तो १४ रोजी युकेहून घरी आला आहे. चौथा तरुण यावल येथील असून तो मुंबईत विमानतळावर कामाला आहे. घरी आल्यानंतर चौघांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात येवून कोरोनासंदर्भात तपासणी करुन घेतली आहे.

जनता कर्‍फ्यूसाठी यंत्रणा सज्ज

या रुग्णालयात सध्या शुक्रवारचे तीन आणि शनिवारचे चार असे एकूण सात रुग्ण दाखल असल्याचेही डॉ.खैरे यांनी सांगितले. तसेच रविवारी जनता कर्‍फ्यू असल्याने विशेष काळजी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. सर्वांना मुख्यालयात हजर राहून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातही आवश्यक असेल, तरच रुग्णांनी यावे. रुग्णांच्या नातेवाईकांनी सुरक्षेच्या दृष्टीने गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या