Saturday, May 11, 2024
Homeधुळेधुळ्यात मालेगावच्या तरुणीचाही कोरोनाने मृत्यू

धुळ्यात मालेगावच्या तरुणीचाही कोरोनाने मृत्यू

त्या तरुणीचा धुळे, जळगाव प्रवास प्रशासनाने उचलले कठोर पाऊल

धुळे – 

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा शिरकाव आता खानदेश म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील मालेगावसह धुळे आणि जळगावमध्ये बघायला मिळतो आहे.  धुळ्यात गेल्या 24 तासांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मालेगावातील  एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

ही तरुणी मालेगाव येथून धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. आज, पहाटे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगावी कोरोना बळीचा आकडा हा दोनवर पोहोचला आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या तरुणीला प्रचंड अशक्तपणा आणि श्वसनाचा त्रास होत होता. यामुळे या तरुणीला धुळ्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली चार दिवस या तरुणीवर उपचार सुरु होते. काल (दि.१०) रोजी या तरुणीचा कोरोन रिपोर्ट सिद्ध झाला होता.

राज्यात ठिकठिकाणी संसर्गजन्य कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर आतापर्यंत धुळे जिल्हा सुरक्षित होता. चौफेर सीमेलगतच्या जळगाव, नाशिक, मालेगाव, शिरपूर सीमेलगत सेंधव्यापर्यंत आणि साक्री- नवापूर सीमेलगतच्या सुरतपर्यंत कोरोनाने पाय पसरले आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

त्या तरुणीचा धुळे, जळगाव प्रवास

मालेगावच्या 22 वर्षीय तरुणीचा धुळ्यात उपचार सुरु असतांना कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ती कोणाकोणाच्या संपर्कात आली याचा तपास घेणे सुरु केले आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणेने तिच्या मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून केलेल्या तपासात धुळ्यानजीक अवधान, फागणे, पुरमेपाडा तसेच जळगाव जिल्ह्यातील मेहरुन परिसरात लोकशन आढळून येते आहे. यापुर्वी मेहरुन येथील कोरोनाबाधित रुग्णाशी काही कनेक्शन आहे का? हेही तपासले जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या