जळगाव : जिल्ह्यात आढळले ११६ पॉझिटिव्ह रुग्ण
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आढळले ११६ पॉझिटिव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

जिल्ह्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह चक्क ११६ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२८१ झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील २४, भुसावळमधील ५, अमळनेरातील ३, चोपड्यात २१, पाचोरा १, भडगाव १, धरणगाव ८, यावल ७, एरंडोल १०, जामनेर ९, जळगाव ग्रामीण ३, रावेर १, पारोळा १४, मुक्ताईनगर, ३, बोदवडमधील ६ रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com