Video : कोरोनामुक्त समृद्ध, सशक्त नाशिकसाठी जिल्हाधिकाऱ्यांची टीम ‘संकट सोबती’
स्थानिक बातम्या

Video : कोरोनामुक्त समृद्ध, सशक्त नाशिकसाठी जिल्हाधिकाऱ्यांची टीम ‘संकट सोबती’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आताची परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. वेळोवेळी नाशिककरांना संबोधित करून जिल्हाधिकारी जनजागृती करत आहेत. फेसबुक, युट्युबच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिककरांशी संपर्क घट्ट करून ठेवला आहे.

दररोज नागरिकांच्या जबाबदाऱ्या, प्रशासनाच्या जबाबदाऱ्या, प्रशासनाची कार्यप्रणाली जिल्हाधिकारी नाशिककरांना समजावून सांगत आहेत.

आज जिल्हाधिकारी मांढरे यांनी त्याचे संकट सोबती टीमची ओळख करून दिली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकरी, अपर जिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्यांची टीम संकट सोबती जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजित केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच आपल्या अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करून त्यांचे नावे आणि फोन नंबर प्रसिद्ध केले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com