Video : नियमांचे उल्लंघन झाल्यास सवलती मागे घेतल्या जातील – जिल्हाधिकारी
स्थानिक बातम्या

Video : नियमांचे उल्लंघन झाल्यास सवलती मागे घेतल्या जातील – जिल्हाधिकारी

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

लाॅकडाउनच्या चौथ्या टप्प्यात अटिशर्ती काहिश्या शिथील  करुन दैंनदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिकांकडून त्याचा दुरुपयोग केला जात असून यापुढे असेच सुरु राहिले तर सवलती मागे घेतल्या जातील, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला.

नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात ९८३ करोना पाॅझिटिव्ह रुग्ण असून त्यातील अनेकजण करोनामुक्त झाले आहे. मालेगाव व नाशिक महापालिका रेड झोनमध्ये आहे.

यातील कंटेंटमेंट झोन वगळता इतर भागात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दैंनदिन व्यवहार सुरु असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे हा उद्देश अाहे. मात्र, बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठीगर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सी नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसते.

दुचाकीवर एकच व्यक्ती व इतर नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येते आहे. करोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी धोका अजून टळलेला नाही. तरी पण नागरिकांकडून  दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेतला जात आहे.

नागरिकांनी सहकार्य न केल्यास नाईलाजाने दिलेल्या सवलती मागे घ्यावा लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टनचे नियम पाळणे,  तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com