काळजी नसावी, नाशिकमध्ये पुढील तीन महिने पुरेल इतका साठा – जिल्हाधिकारी

काळजी नसावी, नाशिकमध्ये पुढील तीन महिने पुरेल इतका साठा – जिल्हाधिकारी

नाशिकमध्ये नागरिकांनी विनाकारण गर्दी करण्याचे काहीही कारण नाहीये. नाशिकमध्ये पुढील तीन महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. ते युट्युबच्या माध्यमातून नाशिककरांना संबोधित करत होते.

ते म्हणाले, साठेबाजी, साठा करून ठेवणे टाळा असेही मांढरे यांनी आवाहन केले आहे. भाजीपाला मिळण्यासाठी कमीत कमीत वेळा बाजारात जावे, दोन ऐवजी चार दिवसांनी बाहेर कसे पडावे या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे.

आपल्याला रुग्णांचा गुणाकार होऊ द्यायचा नाहीये. आपत्कालीन संपर्क जाहीर केले असून काही अडचण असल्यास नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करावा.

शेतमाल पोहोचविणे, जीवनावश्यक सामानाची वाहतूक करण्यासाठी अडचण येत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. सर्व अधिकाऱ्यांचे नंबर जाहीर केले असून ते नंबर प्रत्येकाकडे सेव्ह ठेवा.

पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषदेचे काम चांगले सुरु आहे. मनोबल ढासळू नये यासाठी सार्वजन प्रयत्नशील आहेत. घराबाहेर पडताना एका व्यक्तीनेच बाहेर पडावे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com