Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल; विभागीय आढावा बैठकीला सुरुवात

Video : मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल; विभागीय आढावा बैठकीला सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज पाच महत्वाचे मंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आढवा बैठक घेणार आहेत. नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे व अहमदनगर जिल्ह्यांची आढवा बैठक घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

नुकतेच मुख्यमंत्र्यांचे नाशकात आगमन झाले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात येताच मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर लगेचच आढावा बैठकीला प्रारंभ  करण्यात आला आहे.

प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र बैठक घेऊन, सुरु असलेल्या प्रकल्पांचा आणि इतर कामकाजाची माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत. या आढवा बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादा भुसे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे राहणार आहेत.

थोड्याच वेळेपूर्वी मुख्यमंत्र्यांचे ओझर विमानतळावर स्वागत पालकमंत्री छगन भूजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढवा बैठक घेणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे,  नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती आहे. नुकताच मुख्यमंत्र्याचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. एकाच वेळी महत्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक नाशिकला होत असल्यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या