Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रCM LIVE : विनाकारण घराबाहेर पडू नका; गर्दी करू नका – मुख्यमंत्री

CM LIVE : विनाकारण घराबाहेर पडू नका; गर्दी करू नका – मुख्यमंत्री

मुंबई | प्रतिनिधी

एकूणच सर्वांना कोरोना व्हायरस च्या गंभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युध्दाशी केली आहे.1971 चे युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहील पाहिजे. घरातून बाहेर पडलो की, शत्रू घरात येईल.

- Advertisement -

 या निमित्ताने का होईना ना. या निमित्ताने गमावलेले सर्व मिळविण्याचा प्रयत्न. केंद्राने सूचना केली की, वातानुकूलित यंत्र बंद ठेवण्याचे निर्देश ते आधीच आपण त्या सूचना दिल्या आहेत.

ज्यांचे तळहातावर पोट आहे, त्यांची सरकार काळजी घेणार. ज्या कंपन्या आहे. त्यांचे मालक मदतीसाठी पुढे येत आहेत. सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या आस्थापना बंद केल्या आहेत या कर्मचाऱ्यांचे त्यांचं वेतन कपात करू नका.

जीवनावश्यक वस्तू आहे. त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आरोग्याच्या सेवाही बंद राहणार नाही. शेती मालाची वाहतूक,शेतीची काम सुरू राहील. फक्त गरजेपुरते बंद ठेवा. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हे युद्ध आपल्याला जिंकायचाच आहे. गुडी पाडव्याला महाराष्ट्रात बहर येते परंतु हे युद्ध जिंकल्यानंतर पुन्हा आनंदाने गुडी उभारूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या