Video : ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग सुरु होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातल्या ‘या’ अटी
स्थानिक बातम्या

Video : ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग सुरु होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातल्या ‘या’ अटी

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई | प्रतिनिधी 

२० तारखेपासून जे अर्थचक्र थांबले आहे ते काही ठिकाणी आपण परवानगी देणार आहोत. राज्यात काही जिल्हे कोरोनाचे शून्य रुग्ण आहेत. यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन असे झोन केले आहेत. ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगधंद्यांना परवानगी दिली जाणार आहे. मजुरांची काळजी कंपनीच्या आवारात करणार असाल तर असे उद्योग सुरु होतील.

व्हायरस बंदी राहणार आहे. जिल्हाबंदी उठणार नाही. कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये वाहतूक सुरु राहणार आहेत. मात्र, मजुरांची ने-आण होणार नाही. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मजूर जाऊ-येऊ शकणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला आज दुपारी एक वाजता संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाचे महाभयंकर संकट देशासह जगभरात घोंगावत आहे.

अनेक बळी कोरोना विषाणूने आतापर्यंत घेतले आहेत. महाराष्ट्र मात्र अजूनही खंबीरपणे या संकटाला तोंड देत आहेत. प्रधानमंत्री मोदिजी नियमित संपर्कात आहेत. उद्यापासून काही प्रमाणात उद्योग शिथिल करावे लागतील. त्यासाठी नागरिकांची साथ मला हवी आहे. जनतेची साथ असेल तरच आपल्याला पुढे जाता येईल. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत तिथे संचारबंदी शिथिल करावी लागणार आहेत असे ठाकरे म्हणाले.

धार्मिक, सांस्कृतिक, विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक होणार नाही. मुंबई पुणे वगळता वर्तमानपत्र येणाऱ्या दोन दिवसांत सुरु कसे करता येतील बघितले जाईल.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे

हे युद्ध संपणार कधी

शत्रू समोर असता तर त्याचा कधीच नायनाट केला असता

आपल्याच लोकांच्या माध्यमातून आपल्यावर हल्ला करत आहेत

राज्यातील नागरिकांनी संयम ठेवून सामोरे गेले आहे

उद्या सहा आठवडे पूर्ण होणार आहेत

महाराष्ट्रात कोरोनाच्या आतापर्यंत ६६ हजार ७९६ टेस्ट झाल्या आहेत

किमान ९५ टक्के व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत

राज्यात ३ हजार ६०० रुग्ण कोरोनाबाधित आहेत

३०० ते ३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

५२ रुग्ण गंभीर आहेत

हे गंभीर आहेत त्यांना वाचवणे हे लक्ष आहे

ठिकठीकाणच्या डॉक्टर्सकडून समजते कि हे रुग्ण अखेरच्या क्षणी दाखल होत आहेत त्यामुळे मृत्यू ओढवले आहेत

कोणतेही लक्षण लपवू नका. घरच्या घरी उपाय करू नका दवाखान्यात जा उपचार घ्या

रुग्णांनी दवाखान्यात जावे उपचार घ्यावेत कोन्हीही रुग्णाला वाळीत टाकले जाणार नाही अशी आपली संस्कृती नाही

खाजगी डॉक्टरांशी बोलणे झाले ते त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. उद्यापासून या डॉक्टर्सने उपचार करण्यासाठी हे दवाखाने सुरु होणार आहेत.

मुंबईतील डॉक्टर तयार झाले आहेत आता घाबरू नका डॉक्टरांनी सेवेसाठी पुढे यावे. पीपीई किट्स चा तुटवडा आहे. केंद्राकडून होतोय राज्य सरकार पुरवठा करते आहे

धान्याच्या बाबतील ८०-९० टक्के लोकांपर्यंत रेशन पोहोचवले आहेत.

केंद्र मोफत देत आहेत तुम्ही का देत नाहीत असे अनेकजण म्हणतात

मात्र, केंद्राकडून केवळ तांदूळ आले आहेत ते वाटप केले जात असून यासोबत डाळ आणि गव्हाचे वितरण होईल.

पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन वाढवले आहे हा चांगला निर्णय आहे.

कोरोनाबाबत खाली लवकर येईल आणि वर जास्त जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावयाची आहे.

जिल्ह्यांच्या सीमा ३ मे पर्यंत बंदच राहणार – मुख्यमंत्री ठाकरे

वृत्तपत्रे स्टॉलवर उपलब्ध करा, घरोघरी पोहोचवणे बंद – मुख्यमंत्री ठाकरे

आपण घरातच बसायचं आहे, अद्याप वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवण्यास संमती नाही : मुख्यमंत्री ठाकरे

जिल्हा बंदी कायम पण माल वाहतूकीला परवानगी – मुख्यमंत्री ठाकरे

इतर राज्यातील मजुरांनी चांगले सहकार्य केले आहे.

महाराष्ट्र सरकार परप्रांतीय मजुरांची चांगली व्यवस्था करत आहे. त्यामुळे सहकार्य करा शक्य असेल तर कामावर या नसेल तर संचारबंदी उठू द्या.

आपल्याला लढायचंच आहे आणि ही लढाई जिंकायचीच आहे.

Deshdoot
www.deshdoot.com