Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसध्या तरी लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही – उद्धव ठाकरे

सध्या तरी लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही – उद्धव ठाकरे

हॉस्पिटलमध्ये गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही; कारवाई करण्यास भाग पाडू नका ; उद्धव ठाकरे यांची तंबी

मुंबई | प्रतिनिधी 

महाराष्ट्रात करोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यात यश आलेले नाही. मात्र, लॉकडाऊन हे स्पीडब्रेकर ठरल्यामुळे काहीप्रमाणात नियंत्रण मिळविता आले आहे. अनेक पोलीस आज करोनाग्रस्त झाले आहेत. तर अनेकांना दुर्दैवी या लढाईत वीरमरणदेखील आले आहे. राज्यातील पोलीस थकले आहेत, त्यांना योग्य उपचार मिळावा तसेच पोलिसांना आजारातून बरे होण्यासाठी, त्यांचा थकवा दूर करण्यासाठी कदाचित लष्कराची मागणी केली जाऊ शकते. पण सध्या तरी लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही. अशा कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. प्रत्येक संकटावर यशस्वी मार्ग काढण्याचा आपला इतिहास आहे त्यामुळे सध्या तरी लष्कर बोलविण्याची गरज महाराष्ट्रात नसल्याचेही ठाकरे म्हणाले. ते आज राज्याला संबोधित करताना बोलत होते.

ते म्हणाले, राज्यात सर्वोतपरी करोनाच्या विरोधात सक्षमपणे लढले जात आहे. अनेक ठिकाणी मजूर अजूनही नोंदणी न करताच पायपीट करून निघाले आहेत. त्यांनी रीतसर प्रशासनाला संपर्क करून श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून आपले राज्य आपले गाव गाठावयाचे आहे. राज्यांतर्गत वाहतूकीवर लवकरच निर्णय घेतला जाईल. सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावत करोना विरुद्धच्या लढाईत एकजूट आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले

पावसाळयाची तयारी आपल्याला आतापर्यन करून ठेवायची आहे. त्यामुळे राज्यात जास्तीत जास्त केंद्र सरकारचे हॉस्पिटल करोनाच्या उपचारासाठी मिळतील याकडे लक्ष आहे. तसेच राज्यातील आयुर्वेद, आयुष, होमिओपथी डॉक्टरांना एकत्र येण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, या डॉक्टरांची मदत ज्या विभागात करता आली त्याठिकाणी करता येईल. तेवढेच अनेक दिवसांपासून याठिकाणी राबत असलेल्या डॉक्टरांना आराम मिळेल.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे 

इतर भागातील मजुरांनी पायी जाण्याचे कारण नाही. सरकारशी संपर्क साधावा

श्रमिक रेल्वेने मजुरांना पाठविले जात आहे

संभाजीनगरची घटना दुर्दैवी

मुंबई लष्कराच्या ताब्यात देण्याची गरज नाही; जे काही करायचे आहे ते जनतेला सांगून करणार

संकट गंभीर असले तरीदेखील सरकार खंबीर आहे

अधिकचे मनुष्यबळ लागले तरच लष्कराची मागणी

पोलीस आजारी पडले तर पोलिसांचा थकवा दूर होण्यासाठी लष्कराला काही दिवस पाचारण करू

टप्प्याटप्प्याने लष्कर आणि पोलीस यांना कर्तव्यावर बजावण्याबाबत निर्णय घेऊ

राज्यांतर्गत वाहतुकीचाही प्रश्न लवकरच मार्गी निघेल

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. प्रत्येक संकटावर यशस्वी मार्ग काढण्याचा आपला इतिहास आहे त्यामुळे सध्या तरी लष्कर बोलविण्याची गरज महाराष्ट्रात नसल्याचे ते भाषणाच्या अंतिम टप्प्यात बोलत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या