पगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई : प्रतिनिधी 

पगारात कपात केली नाही, फक्त टप्प्याटप्प्यात पगार देणार आहोत. राज्याची आर्थिक घडी जी विस्कटली आहे ती भरून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यात वेतन दिले जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. ते आज राज्यातील जनतेला संबोधित करत होते.

ते म्हणाले, बाहेर देशातून आलेल्या नागरिकांनी तपासणी करू घेतली पाहिजे. घरी आहात म्हणून गार पाणी पिणे, थंड खाणे टाळावे. घरातील एसी बंद ठेवले पाहिजेत. घरात मोकळी हवी येऊ द्यावी असेही ठाकरे म्हणाले.

भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना शिस्त पाळली गेली पाहिजे. सोशल डीस्टन्सी पाळली गेली पाहिजे. स्थलांतर करणे टाळा प्रत्येक राज्य सरकारने तेथील इतर राज्यातील लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे कुन्हीही घर सोडून शहर सोडून इतरत्र जाऊ नका.

गेले तर पुन्हा आहेत त्याच ठिकाणी परतावे लागेल. जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची ने-आण होणार्या वाहनांवर कारवाईदेखील होत आहे. त्यामुळे कुन्हीही कुठेही जाऊ नका असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री संबोधित करताना या मुद्द्यांवर बोलले

 • या लढाईमध्ये आपला संयम आणि आत्मविश्वास हीच आपली तटबंदी आहे. विषाणू या तटबंदिला आपटून आपटून मरणार आहे, म्हणून आपण ही तटबंदी सोडू नका.
 • मी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या लोकांसोबत बोललो. मला त्यात सैनिक दिसत होते त्यांचे मला खुप कौतुक वाटले.
 • हे संकट मोठं आहे , करोना नंतर आर्थिक परिस्थिती उद्भवणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी वेतन कपात नाही तर वेतन हे टप्प्या टप्प्यात देणार आहोत.
 • वेतन कपात नाही तर आर्थिक घडी बसविण्यासाठी केलेली उपाययोजना आहे.
 • सहकार्याच्या जोरावर ही लढाई जिंकायची आहे.
 •  जसजस दिवस पुढे जातंय तसे आपण लढाईच्या जवळ जातोय.
 • आपण एरिया सील करतोय कारण ही लढाई जिंकायची आहे; आजूबाजूच्या नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झालाय का हे तपासण्यासाठी एरिया सील केले आहेत.
 • मला विनंती अशी करायची आहे की, परदेशातून आलेल्या लोकांनी स्वतः हुन पुढे या आणि तपासणी करून घ्या.
 • एलर्जी होऊ देऊ नका, वातावरण बदलत चाललंय, उन्हाळा सुरु होतोय, एसी लावू नका, मोकळ्या हवेत हा विषाणू टिकत नाही त्यामुळे घरात मोकळ्या हवेचे वातावरण असू द्या.
 • थंड पाणी पिऊ नका, गरम पाणी प्या, काही सर्दी खोकला जाणवल्यास लगेच तपासणी करून घ्या.
 • मी सर्व खाजगी डॉक्टर ला विनंती करतो की, त्यांनी या दवाखान्यात पेशंटला तपासा, जर सर्दी खोकला किंवा कोरोनाचे लक्षण असलेला कोणी पेशंट असले तर त्याला शासकीय रुग्णालयात पाठवा.
 • स्थलांतरीतांनी स्थलांतर करू नका. आहे तिथेच थांबा, तुमची अन्नपाण्याची सगळी सोय केली जाते आहे.
 •  जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याने आता कोणीही जाऊ नका.
 • प्रत्येक जिल्ह्यात सूचना दिल्या आहेत, त्यामुळे राज्यात 1000 केंद्र तयार आहे लाख सव्वा लाख लोकांना आपण जेवण देत आहोत.
 • मी त्यांना सांगू इच्छीTओ की त्यांनी कोठेही जाऊ नका. तुमची जबाबदारी आम्ही घेतोय, आपल्या राज्यातील लोकांची जबाबदारी दुसऱ्या राज्यातील सरकार घेत आहे.
 • रेशन बद्दल केंद्र सरकारकडून आलेल्या सूचनांनुसार आणि राज्य शासनाच्या सूचनांनुसार वाटप होणार आहे.
 • आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे आणि त्याचे वाटप सुरू होणार आहे.
 • गैरसोय होते आहे त्याबद्दल मी दिलगीर आहे, कोणाचीही गैरसोय होणार नाही.
 • मला पोलीस, डॉक्टर, नर्स, चालक या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे. कारण ते लोकांसाठी 24 तास रस्त्यावर आहे.
 • लोकांमध्ये हळू हळू शिस्त येते आहे ती हळू हळू नकोय. लवकर पाहिजे आहे.
 • शिस्त मोडली की आपण विषाणूला आमंत्रण देतोय.
 • शिवभोजन थाळी 5 रुपयात आहे. आणि तिची मर्यादा देखील एक लाखापर्यंत केलेळी आहे.
 • रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणारे देखील आहेत
 • हे युद्ध आपण जिंकणारच हा आत्मविश्वास पाहिजे ; आत्मविश्वास असेल तर आपण जिंकणारच.

Last updated

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com