वरणगाव : दर्यापुरात रोखला बालविवाह

वरणगाव : दर्यापुरात रोखला बालविवाह

घटनेबाबत वरिष्ठ गाफील

येथुन जवळच असलेल्या दर्यापुर ता. भुसावळ येथील विठ्ठल मंदिरमध्ये येथीलच एका  ( वर ) मुला चे ( ता. ५ ) चिखली ता. मलकापूर येथील एका अल्पवयीन  ( वधू )मुलीसोबत बालविवाहाचे नियोजन होते मात्र दर्यापूरगावचे ग्रामसेवक वाडिले यांना विवाहासंदर्भात गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी विवाह रोखला पंरतु ग्रामसेवक व सरपंच यांनी सदस्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती देणे अपेक्षीत होते मात्र त्यांनी बालविवाहाची माहिती यंत्रणे पासून लपवून ठेवल्याने सर्वत्र ग्रामसेवक यांचे बाबत शंका निर्माण झाली आहे
सन,२००६ अंतर्गत बालविवाह करणे किंवा करऊन देणे कायदेशीर गुन्हा मानला जातो परंतू ज्या गावात बालविवाह होणार आहे तो विवाह रोखण्यासाठी त्या गावातील सरपंच व सदस्यासह ग्रामसेवक यांनी नैतीक विवाहासंदर्भात माहिती गोळा करून विवाह थांबवणे व तशी माहिती संबधीत पोलिस स्टेशन व वरीष्ठ अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असते.
त्याच दृष्टीकोनातून (ता. ५ ) चिखली ता. मलकापूर येथील  अल्पवयीन (वधू ) मुलीचा ( जन्म तारीख २२ / ८ / २००२ ) विवाह (ता.५ ) रोजी दुपारी १२ वाजता  दर्यापूर ता. भुसावळ येथील मुला ( वर )सोबत दर्यापूर येथील विठ्ठल मंदिरा मध्ये नियोजन करण्यात आले होते.
विवाहाची तयारी सुरू असतांना ग्रामसेवक वाडिले यांना बालविवाहा संदर्भात गुप्त माहिती मीळाली होती श्री वाडिले व सरपंच यांनी गावाचे ग्रामपंचायत सदस्यांच्या सदर विषय लक्षात आणुन न देता परस्पर विवाह स्थळी जाऊन नवऱ्या मुलीचे जन्म तारखेचा पुरावा पाहुन स्वतः शहानिशा करून खात्री करून घेतल्यावर विवाह मोडकळीस आणला .
मात्र ग्रामसेवक वाडिले व सरंपच यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या घडलेला प्रकार लक्षात आणून देणे किंवा स्थानिक पोलिस स्टेशनला सदर घटने बाबत माहिती देऊन बाल विवाह संरक्षण कायदया अंतर्गत गुन्हा नोंद करणे अपेक्षीत होते मात्र श्री वाडिले यांनी परस्पर प्रकरणाची विल्हेवाट लावत निपटारा केला असल्याची सर्वत्र चर्चा आहे
दर्यापुर येथील बालविवाहाच्या घडलेल्या प्रकरणा विषयी ग्रामसेवक वरीष्ठ अधिकाऱ्यांसमोर विषय मांडणार आहेत त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल
अनिता जितेंद्र लोंखडे,सरपंच दर्यापूर ता . भुसावळ
सदर प्रकरणाची माहिती संबधीत ग्रामसेवकाने वरीष्ठ अधिकारी वर्गा पर्यंत देणे अपेक्षीत होते परंतु अद्याप बालविवाहा संबधी माहिती आली नसली तरी मी स्वतः माहिती काढून योग्य ती कारवाई करणार आहे
विलास भाटकर,गटविकास अधिकारी पंचायत समीती भुसावळ
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com