छत्तीसगढ : सुट्टी मिळण्याच्या वादातुन झालेल्या गोळीबारात सहा जवानांचा मृत्यू
स्थानिक बातम्या

छत्तीसगढ : सुट्टी मिळण्याच्या वादातुन झालेल्या गोळीबारात सहा जवानांचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

छत्तीसगढ : नारायणपूर येथील इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) शिबिरात धक्कादायक घटना घडली असून घटना घडली. जवानांमधील परस्पर वादानंतर झालेल्या गोळीबारात तब्बल सहा सैनिकांचा मृत्यू झाला असून २ जवान जखमी आहेत. बुधवारी (दि. ०४) सकाळच्या सुमारास हि घटना घडली. सुट्टीच्या वादानंतर ही सनसनाटी घटना घडली आहे.

दरम्यान नारायणपूर या ठिकाणी इंडो-तिबेट सीमा पोलीस कॅम्प चालू असतांना हि घटना घडली. सुट्टीच्या कारणावरून हि घटना घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने रायपूर येथे हलविण्यात आले आहे.

बस्तर जिल्ह्याचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यातील काडेनर गावात आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमधील सैनिकांमध्ये गोळीबार झाला. एका कॉन्स्टेबलने या गोळ्या घातल्या असून हल्ल्यानंतर स्वतःही गोळी मारल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर आर्मी कॅम्पमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com