Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : जीत जायेंगे हम, तुम अगर संग हो! चांदवड तालुक्यातील शिक्षकाने...

Video : जीत जायेंगे हम, तुम अगर संग हो! चांदवड तालुक्यातील शिक्षकाने साकारलेल्या रांगोळीची चर्चा

नाशिक | प्रतिनिधी 

“जीत जायेंगे हम,तुम अगर संग हो”

- Advertisement -

“देश को इस रोग से बचाना है।”

अशा आशयाची तब्बल चौदा तास खर्च करून ४.५ बाय ६.५ फुटांची रांगोळी चांदवड तालुक्यातील कलाशिक्षक असलेल्या अवलियाने साकारली आहे. आपल्या घराच्या हॉलमध्ये घरात बसून देशभर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या प्रत्येकाच्या आदराप्रती प्रेमभावना व्यक्त करत रांगोळी साकारली आहे. रांगोळी काढतानाच व्हिडीओ आणि रांगोळीचे फोटो सर्वत्र समाजमाध्यमांत व्हायरल होत असून जिल्ह्यात प्रचंड चर्चा आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर केला आहे. आजपर्यंत जगातील हजारो नागरिकांचा जीव कोरोनाने घेतला आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवा व्यवस्थित सुरु आहेत. पोलीस, प्रशासन त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावताना दिसतात. अशा सर्वांना वंदन करण्यासाठी चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी तब्बल चौदा तास खर्च करून एक रांगोळी काढली आहे.

भारतात हळू-हळू या कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. सरकार व प्रशासन दिवसागणिक या लढाईत नवीन पाऊले उचलत आहेत. भारतातील जनतेची काळजी घेऊन संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. वेळीच प्रत्येकाने काळजी नाही घेतली तर भारतातही कोरोना मृत्यूचे तांडव करेल अशी शक्यता वर्तीविण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आदि प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत. सामाजिक कार्यक्रम, खासजी कार्यक्रम, सोहळ्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. अशातच २४ तास राब राब राबणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय, स्वच्छता कर्मचारी यांच्याप्रती आदरभावना व्यक्त केली जात आहे.

आपल्याला कोरोना विरुद्ध लढाई जिंकायचीच आहे, आणि आपण ती जिंकणारच. फक्त प्रत्येक भारतीयाने सरकार व प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत. घराबाहेर पडू नये हीच देशप्रेम व देशभक्ती दाखविण्याची  मौलिक संधी आता आली आहे. ती प्रत्येकाने दाखवावी व भारताला या कोरोना नामक भयंकर अशा संकटातून वाचवावे असे म्हटले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या