चाळीसगावात बाहेरगावाहून आलेल्या चौघांवर गुन्हा
स्थानिक बातम्या

चाळीसगावात बाहेरगावाहून आलेल्या चौघांवर गुन्हा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

मालेगावहुन शहरात आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन ग्रामीण त्याला होम क्वारंटाईन केले आहे. तसेच चाळीसगावात बाहेरगावाहून आलेल्या चौघांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगावपासून मालेगाव अवघ्या 52 किलोमिटर अंतरावर आहे. तसेच चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड परिसरातील जवळपास 32 गावाचा संपर्क मालेगावशी दररोज येत होता. चाळीसगाव देखील बामोशी बाबांच्या उरुसा निमित्ताने अनेक भाविक चाळीसगावात येवून गेले आहेत. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव चाळीसगावकरांसाठी धोकादायक ठरत आहे.

मंगळवारी पुन्हा मालेगावहुन एक 24 वर्षाचा तरुण येथील पवारवाडी भागात आपल्या घरी आला. याची माहिती परिसरातील रहिवाशांना मिळाली. पोलिसांना तात्काळ त्याला ताब्यात घेवून, तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी त्यांची तपासणी करुन त्याला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले.

मंगळवारी मालेगावसह नाशिक, औरंगाबाद व मनमाड आशा ठिकाणाहुन आलेल्या चौघांना डॉक्टरांनी होम क्वारंटाईन केले आहे.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पोना.पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यांदीवरुन मालेगावहुन चाळीसगाव दाखल झालेला सुलतान अजिन खान(24) रा.पवारवाडी, नाशिकहुन आलेला ईजाजशेख रहोमोद्दीन(35) रा.चांमुडामाता मंदिर, औरंगाबादहुन आलेला महेंद्र प्रभाकर बेडेकर(29)रा.नारायणवाडी, मनमाडहुन आलेला सुनिल धनश्याम नुनासे (रा.बामोशीबाबा दर्गा)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्याचा घरी हे चौघे आले त्यांनाही सहआरोपी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ.बापुराव भोसले करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com