चाळीसगाव :  कोरोनाग्रस्त नर्स आणि कंपाऊडर संपर्कातील २० जणांचा अहवाल निगेटिव्ह
स्थानिक बातम्या

चाळीसगाव :  कोरोनाग्रस्त नर्स आणि कंपाऊडर संपर्कातील २० जणांचा अहवाल निगेटिव्ह

Balvant Gaikwad

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहरातील कोव्हिड केअर सेन्टरमध्ये काम करणारी ३५ वर्षीय नर्स व खाजगी रुग्णालयातील २१ वर्षीय कंपाऊडर अशा दोघांना नुकतीच कोरोनाची  बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या २० जणांचे स्वॅबचा घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली.

चाळीसगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी देखील काळजी घेण्याची गरज आहे. कोव्हिड केअरमधील नर्स कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची बांधा झाली, तर डोण येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने खाजगी रुग्णालयातील कंपाऊडरला कोरोनाची बाधा झाल्याचे निषन्न झाल होते. त्यामुळे शहरात होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com