Thursday, April 25, 2024
Homeजळगावकोरोना : आम्हाला आधी खायला द्या ,मग हवी ती कारवाई करा ..!

कोरोना : आम्हाला आधी खायला द्या ,मग हवी ती कारवाई करा ..!

चाळीसगाव – 

लॉकडाऊनच्या काळात चेन्नईहुन राजस्थानकडे जाणार्‍या १३ मंजुरांना चाळीसगावात पकडले आहे. विशेष म्हणजे या १३ मंजुरांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारलेला आढळुन आला आहे. या मंजुरांना चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात होम क्वॉरन्टाईन करण्यात आले असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील मेहुणबारे हद्दीतील तरवाडे बारी येथे दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आरटीओच्या पथकाने मंजुरांचे वाहन पकडले, आणि ते मेहुणबारे पोलीस स्टेशनचे निरिक्षक सचिन बेद्रे यांच्या ताब्यात दिले. त्यानतंर ते मजुरांसह वाहन चाळीसगाव तहसील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

कोरोना या अतिशय जिवघेण्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी सध्या विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतू कर्नाटकात कामाला गेलेले १३ मजुर होमक्वारंटाईनचा हातावर शिक्का असूनही एका खाजगी वाहनाने राजस्थानकडे पळून जात असतांना चाळीसगाव-धुळे रस्त्यावर तरवाडे बारीजवळ आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पकडले.

पकडलेल्या सर्व मजुरांच्या येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय चाचणी करुन त्यांना चाळीसगाव महाविद्यात पुढील १४ दिवसांसाठी होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान चालक व मजुर गेल्या तीन दिवसांपासून भुके होते. त्यांना पकडलेल्या बरोबर आम्हाला आधि जेवण द्या आणि हवी ती कारवाई करा अशी विनवणी पोलिसांकडे केल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या