लॉकडाऊन : ‘हसत-खेळत’ ३२ हजारांची बिअर लंपास
स्थानिक बातम्या

लॉकडाऊन : ‘हसत-खेळत’ ३२ हजारांची बिअर लंपास

Balvant Gaikwad

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात जिवावश्यक वस्तूची दुकाने वगळून दारुसह इतर दुकाने बंद करण्यात आल्याने, तळीरामाचा चांगला तिळपापड झाला आहे. दारुची दुकाने बंद असल्यामुळे आता दारुड्यानी चक्क दारुसाठी चोरीचा मार्ग अवलंबला आहे.

चाळीसगाव शहरालगत टाकळी प्र.चा.भागातील हॉटेल हसत-खेळतमधून चक्क ३१ हजार १० रुपय किमतीच्या बिअरच्या बॉटल अज्ञात चोरट्यांनी लपास केल्या आहेत. यामुळे बिअर-बार मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हि घटना दि.१३ रोजी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान चोरटे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहरालगत टाकळी प्र.चा.हद्दीतील हॉटेल हसत-खेळत देशात लॉकडाऊन घोषीत केल्यापासून बंद करण्यात आली. हॉटलेमध्ये असलेल्या बिअरच्या बॉटल्स एक खोलीत व फ्रिजमध्ये ठेवून हॉटेल बंद केल्यानतंर दि.१ /४/२०२० रोजी राज्य उत्पादन शुक्लच्या आधिकार्‍यांनी येवून हॉटेलला आतून  व बाहेरुन सिल केले होते.

दि.१३ रोजी हॉटले चालविणारे दिपक भिकन चौधरी हे नेहमीप्रमाणे हॉटेलवर पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना हॉटेलच्या रुमच्या शर्टरचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी आता जावून पाहणी केल्यानतंर, बिअरची चोरी झाल्याचे लक्षात आले. यात बडवॉयझर माईल्ड, बडवॉयझर स्टॉग, किग फिशर स्टॉग, कॅनॉन १०००, किग फिशर टिन आदि कंपनीच्या एकूण ३२ हजार १० रुपयांची दारु लांबविण्यात आली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिपक भिकन चौधरी रा. चौधरी वाड यांच्या फिर्यादीवरु अज्ञात चोरट्याविरोधात भादवी कलम ३८०,४५४,५४७ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटे पोलिसांच्या हाती लागले असून मध काढण्याच्या नावाखाली ते दररोज हॉटेलमध्ये झावर चढून प्रवेश करीत होते. त्यांनी दोन ते तीन दिवस सतत हॉटेलमध्येच दारुची पार्टी केली.

नतंर त्यांनी ३२ हजारांचा दारु चोरुन नेली, त्यातील एक तळीराम दररोज दारु पिऊन रस्त्यावर खुलेआम फिरत असल्यामुळे पोलिसांनी माहिती घेतली असता, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध लागल्याची माहिती हाती आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com