चाळीसगाव : पाच लाखांचे बनावट खत जप्त

चाळीसगाव : पाच लाखांचे बनावट खत जप्त

चाळीसगाव येथे गुजरात राज्यातून आलेले शेती उपयोगी बनावट राससीयक खत विक्रीचा डाव कृषी विभागाच्या सर्तकतेमुळे फसला आहे. सोमवारी येथील कन्नड रोडवरील गोडाऊनमध्ये खाली होत असलेल्या बनवाट खतांचा ट्रक कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आला. यात सुमारे २५ मेट्रीक टन वजनानचे ५ लाख २५ हजार रुपय किमतीचे ५०० खतांच्या गोण्या आढळुन आल्या आहेत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला कृषी केद्र चालकासहा सात जणांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला.

चाळीसगाव-कन्नड रोडवर महिंद्र ट्रक्टरच्या शो रुम समोर एक गोडाऊनमध्ये  किसान ज्योती, एनपीके (१८:१८:१०) या कंपनीचे बनावट खताच ट्रक गुजरातहुन  येणार असल्याची गुप्त माहिती नाशिक व जळगाव येथील कृषी विभागाच्या आधिकार्याना मिळाली. त्यानुसार आज दुपारी एमएच १८, एए ७३२४ हा घाटरोड  येथील  भिकन अर्जुन पाटील, राजेश अर्जुन पाटील यांच्या मालकीच्या भाडेतत्वावर दिलेल्या गोडावूनमध्ये खाली होत असताना, कृषी विभागाच्या व पोलिसांच्या पथकाने पकडला.

या ट्रकमध्ये किसान ज्योती, एनपीके (१८:१८:१०) या कंपनीचे बनावट खत्यांच्या २५ मेट्रीक टन असलेल्या ५०० बॅगा मिळुन आल्यात. या खताची किमत बाजराभावाप्रमाणे ५ लाख २५ हजार रुपय आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला जळगाव जिल्हा गुणवता नियंत्रक अरुण तायडे  यांच्या फिर्यादीवरुन महावीर कृषी केंद्राचे संचालक शैलेश छाजेड यांच्यासह बनावट खते तायर करणारा कारखाना मालक, स्टार बेनटॉनीक संचालक, गोडाऊन मालक भिकन अर्जुन पाटील, राजेश अर्जुन पाटील, ट्रक चालका गोपीचंद नाना सोनवणे, रविंद्र रामा धनगर आशा विरोधात भादवी  कलम ४२० व खत नियंत्रण आदेश व जिवानाआश्यक वस्तू कायद्याच्या विविध कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे  सातारा येथील एका बंद पडलेल्या खत कंपनीचे नाव वापरुन हे बनावट खत विक्री केली जात असल्याचे पथकाच्या चौकशीत निपन्न झाले. दरम्यान कृषी विभागाच्या पथकाने पंचनामा करुन ट्रक ताब्यात घेतला असून हे खत शासकिय गोडावूनमध्ये ठेवले आहे. तसेच खताचे नमूने पुढील तपासणी प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ही कारावाई  कृषी विभागाचे नाशिक येथील गुणवत्ता नियंत्रक उल्हास ठाकुर, जळगाव जिल्हा गुणवता नियंत्रक अरुण तायडे, तालुका कृषी आधिकारी सी.डी.साठे, पंचायत समितीचे कृषी आधिकारी एम.एस.भालेराव, कृषी सहाय्यक अविनाश चंदिले, चंद्रशेखर वाणी, संजय चव्हाण, पोउपनि. विजय साठे, पोकॉ.शैलेश पाटील, सतीष राजपूत आदिच्या पथकाने केली आहे.

तालुका कृषी विभागाला बनावट खत विक्री खबर कशी नाही

चाळीसगाल येथे बनावट खत विक्रीसाठी येत असल्याची माहिती नाशिक येथील कृषी विभागाच्या आधिकार्‍यांना मिळाली. त्याअनुसार सोमवारी गुप्त कारवाई करत, तब्बल सव्वा पाच लाखांचे बनावट साययिक खत जप्त करण्यात आले. या कारवाईत स्थानिक आधिकार्‍यांना अगदी वेळेवर कारवाईबाबत माहिती देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव येथील कृषी आधिकार्‍यांबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत.

त्यामुळे चाळीसगावात कृषी आधिकार्‍यांच्या संगनमतानेच हा काळाबाजार सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात काही शेतकरी व कृषी केंद्र संचालकांमध्ये आहे. तसेच बर्‍याच कृषी केंद्र चालकांचे, कृषी आधिकार्‍यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन, दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com