चाळीसगाव : डोण येथील मयत वृद्ध करोना पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

चाळीसगाव : डोण येथील मयत वृद्ध करोना पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या डोण (ता.चाळीसगाव) येथील 70 वर्षीय वृद्धाचा शुक्रवार सकाळी मृत्य झाला होता. आज या वृध्दाचा अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाँ.बी.पी. बाविस्कर यांनी दिली.

तर एका खासगी डॉक्टर व महिलेचा अहवाल निगेटिव आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता चाळीसगाव येथे कोरानाग्रस्ताची संख्या दोन झाल्यामुळे तालुक्यात भयभित वातावरण निर्मित झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com