चाळीसगाव : भाजपाच्या नगरसेवकाडून शिवाजी महाराजांच्या बॅनरची विटंबना
स्थानिक बातम्या

चाळीसगाव : भाजपाच्या नगरसेवकाडून शिवाजी महाराजांच्या बॅनरची विटंबना

Balvant Gaikwad

शिवसृष्टी सोहळ्याच्या बॅनरचा मुतारीसाठी वापर

शिवप्रेमीचा पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल होण्यासाठी ठिय्या

महाराष्ट्रतील दुसरा ‘ छिंदम ’ म्हणून सोशल मिडीयातून निषेध

शिवाजी महाराजाची प्रतिमा असलेल्या बॅनरचा मुतारीसाठी वापर केल्याचा जाब विचारल्याने चाळीसगावात एक तरुणाला घरात घुसून भाजपाचे नगरसेवक व त्यांच्या सोबत असलेल्यानी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला बुधवारी दुपारी शहरातील शिवप्रेमीनी ठिय्या मांडून गुन्हां दाखल करण्याची मागणी केली. शिवप्रेमीच्या भावान लक्षात येवून शेवटी चाळीसगगाव पोलीस स्टेशनला विनयभंगासह धार्मिक भावान दुखावल्या प्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून दिवसभर सोशल मिडीयावर महाराष्ट्रातील दुसरा ‘ छिंदम ’म्हणून पोस्ट करुन, भाजपाचे नगरसेवक ‘ राजेंद्र चौधरी ’ यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपाचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांचे सीताराम पैलवान यांच्या मळ्यात अपार्टमेंटचेे बांधकाम चालू आहे. याठिकाणी चाळीसगावात ‘ माजी तथा विद्यामान खासदार उन्मेष पाटील यांनी 20 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित ‘ शिवस्मारक भूमीपूजन सोहळा ’ आयोजनासाठी तयार केलेले, बॅनर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी मुतारीसाठी लावले होते, त्यावर शिवाजी महाराजांचा फोटा असल्याने, शिवभक्त एका तरुणाने नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना, त्याबद्दल जाब विचारला असता. नगरसेवक चौधरी यांनी आपले मुले व भावांच्या मदतीने तरुणासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना घरात घुसून तलवारीने हल्ला करून मारहाण केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजाची अशा प्रकारे समाजामध्ये विटंबना केल्याबद्दल चाळीसगावातील शिवप्रेमी बंधांवाकडून या घटनेचा बुधवारी तीव्र निषेध करण्यात आला, तसेच नगरसेवक राजेंद्र चौधरी व संबंधीतावर तात्काळ गुन्हां दाखल करण्यासाठी शहारातील शिवप्रेमीनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला ठिय्या आदोलन करुन, या घटनेचा तीव्र निषेध केला.

तसेच पुढे तीव्र आदोलन करण्यात येईल यासंबंधीचे निवेदन चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पो.निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना दिले. यानिवेदनावर खुशाल रेवजी पाटील, गणेश पवार, लक्ष्मणबाबू शिरसाठ, दिलीप घोरपडे, टोनू राजपूत, संजय कापसे, अरुण पाटील, अभयसिंह राजपूत, सचिन पवार, किशोर पाटील आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत.

शिवेप्रेमीच्या आदोलनानतंर नगरसेवक राजेंद्र चौधरीसह सहा जणांवर गुन्हा दाखल-
शिवप्रेमीच्या आदोलनानतंर अखेर चाळीसगाव पोलीस स्टेशनला राजेंद्र चौधरी यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. शहरातील लक्ष्मीनगर येथे राहणार्‍या 44 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की राजेंद्र रामदार चौधरी, विजय रामदास चौधरी, संजय रामदास चौधरी, राहुल राजेंद्र चौधरी, गौरव राजेंद्र चौधरी, विजय राजेंद्र चौधरी यांच्या मुलगा संपूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. लक्ष्मीनगर आशानी दि,5 रोजी शहारतील देवकर मळा भागात राजेंद्र चौधरी यांच्या अपार्टमेंटचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ‘ छत्रपती महाराज ’ यांचा फोटो असलेला बॅनरचा उपयोग करुन, विटंबणा केल्याच्या कारणावरुन वरील सर्व संशयित आरोपीन फिर्यादाची मुलगा अर्जुनसिंग या लाकडी काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादी व तिचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी गेला असता, फिर्यादीचा दुसरा मुलगा करणसिंग याला शिवीगाळ करुन मारहाण केली.

राजेंद्र चौधरी यांनी फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत केले. तसेच आरोपी क्र.5 याने त्यांच्या हातातील तलवार अर्जुनसिंग यांच्या डोक्यावर मारुन दुखापत केली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवर भाजपाचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यासह विजय रामदास चौधरी, संजय रामदास चौधरी, राहुल राजेंद्र चौधरी, गौरव राजेंद्र चौधरी, विजय राजेंद्र चौधरी यांच्या मुलगा संपूर्ण नाव माहीत नाही यांच्या विरोधात भादवी कलम 143,147,148,149,307,354,295(अ)323,324,504,506,427 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com