इंदिरानगर : महिलेची पोत ओरबाडली; सराफ लॉन्स परिसरातील घटना
स्थानिक बातम्या

इंदिरानगर : महिलेची पोत ओरबाडली; सराफ लॉन्स परिसरातील घटना

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इंदिरानगर | वार्ताहर

सराफ लॉन्स परीसरात महिलेची दहा ग्रम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत सुमारे पच्चविस हजार रुपये बळजबरीने ओरबाडून
नेल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा रमेश घुले (वय 60 रा प्लॉट नंबर 18 चैत्र रो बंगला सराफ नगर) या
मंगळवार ( दि१८)  रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास आपल्या पतीसमवेत कलानगर स्टॉप येथे डोळ्यांच्या चेकअपसाठी रिक्षाने गेल्या होत्या.

तपासणी झाल्यानंतर इंदिरा नगर पाथर्डी रस्त्याने गुरुगोविंद सिंग कॉलेजच्या गेट नंबर दोन जवळ पायी जात असताना समोरून एक अज्ञात इसम वय अंदाजे 25 ते 30 दुचाकीने भरधाव वेगाने आला व त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे दहा ग्रॅम वजनाचे किंमत पंचवीस हजार रुपये हाताने गळयावर जोरात हात मारुन मंगळसूत्र ओरबाडुन धूम स्टाईल पसार झाला.

याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

परिसरात पादचारी महिलांची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून नेल्याच्या घटना लगातार घडत असुन चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले आहे. एकामागून एक सोनसाखळी च्या घटना वाढत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com