केंद्राची मोठी घोषणा; कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मिळणार चार लाखांची मदत
स्थानिक बातम्या

केंद्राची मोठी घोषणा; कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मिळणार चार लाखांची मदत

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवी दिल्ली | जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा शिरकाव आता विविध शहरात झालेला दिसून येत आहे. या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दोन दिवसांत कर्नाटकमधील कलबुर्गी आणि दिल्लीतील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

यानंतर आज केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा केली आहे. केंद्राच्या घोषणेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

देशात कोरोना विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ८२ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. उपचारांनंतर १० जण बरे झाले आहेत.

करोनाचा उद्रेक पाहता देश, तसेच जगभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अमेरिकेने आणि स्पेनने तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलासादायक घोषणा केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com