किया मोटर्स इंडियाकडून कार्निवल प्रीमियम MPV चे अनावरण
स्थानिक बातम्या

किया मोटर्स इंडियाकडून कार्निवल प्रीमियम MPV चे अनावरण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

किया मोटर्स इंडिया कंपनीने आज ऑटो एक्स्पो २०२० मध्ये भारतीय बाजारपेठेत दोन नवीन उत्पादनांचे अनावरण केले.भारतीय बाजारपेठेत किया मोटर्सची वेगळी छाप पाडण्यासाठी किया सोनेटचे अनावरण प्रथमच करण्यात आले.  ही संकल्पना २०२०च्या दुसऱ्या सहामाहीत भारतीय बाजारपेठेतील अनावरणाच्या आधी विकसित केली जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

कार्निवलचे भारतात अधिकृतरित्या अनावरण तीन विविध तपशीलांसह करण्यात आले. यामध्ये  प्रीमियम प्रकारासाठी प्रारंभीची किंमत 24.95 रूपये (एक्स शोरूम किंमत), त्याच्या लिमोझीन प्रकारासाठी 33.95 रूपये (एक्स-शोरूम) आहे.  कियाला नवीन गाडीसाठी पहिल्या दिवशीच १ हजार ४०० बुकिंग मिळाल्या असून आतापर्यंत ३५०० पेक्षा अधिक बुकिंग झाल्या असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

किया भारतात दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली तेव्हा आम्ही भारतीय ग्राहकांची मने जिंकण्याचा निश्चय केला होता. आज मी म्हणू शकेन की, आमचा दृष्टीकोन जो इथे फक्त उत्तम गाड्या बनवून विकण्यापेक्षा खूप काही जास्त कऱण्याचा होता. तो यशस्वी झाला आहे. आम्हला आता भारतीय ग्राहकांच्या अपेक्षा कळतात आणि आम्ही त्या आमच्या वर्गातील सर्वोत्तम उत्पादने व सेवांशी जोडतो आहोत. आमची नवीन गाडी, किया कार्निवल हे या दृष्टीकोनाचे सर्वोत्तम उदाहरण आहे असे मी म्हणेल.

कुख्यून शिम, किया मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

ऑटो एक्स्पो २०२० मध्ये किया मोटर्सची वाहने

भविष्यातील मोबिलिटी उपाययोजनांसाठी नव काहीतरी आणण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून कियाने आपल्या जागतिक उत्पादनांच्या पोर्टफोलीओतील १४ गाड्यांचे प्रदर्शन केले. त्यात ब्रँडच्या विविध क्रॉसओव्हर आणि इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश होता. यामध्ये  कियाच्या जगभरात विकल्या जाणाऱ्या पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक सोल ईव्हीमध्ये अनेक लोकांच्या नजरेला आवडणारे घटक आहेत.

निरो ईव्ही 

निरो ईव्हीसाठी ऊर्जा आणि शक्ती अद्ययावत, लिक्विड-कूल्ड ६४ केडब्ल्यूएच लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी तसेच शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरमधून येते. वाहनाच्या तळाखाली लावलेली लाँग रेंज बॅटरी प्रवाशांना जास्तीत-जास्त केबिन जागा देते आणि निरो ईव्हीला एकाच चार्जमध्ये ४५० किमी अंतर चालवली जाऊ शकते.

एक्सीड

कियाचे अलीकडील जागतिक पातळीवरील आवडते उत्पादन एक्सीडमध्ये आटोपशीर SUV असून त्यात स्पोर्टी पॅकेजिंग आहे आणि  हॅचबॅकचे हँडलिंग आहे. एक्सीडच्या अद्ययावत सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि इन्फोटेनमेंट तंत्रज्ञानाच्या सूटमुळे ती या वर्गातील सर्वाधिक हायटेक, पूर्णपणे सुसज्ज गाडी ठरली आहे.

प्रीमियम प्रेस्टिजलिमोझीन
७ सीटर८ सीटर७ सीटर९ सीटर७ सीटर
24.9525.1528.9529.9533.95
Deshdoot
www.deshdoot.com