नवीन नाशिक : मोगल नगरमध्ये व्यापाऱ्याने जाळुन घेतले; उपचारादरम्यान मृत्यू
स्थानिक बातम्या

नवीन नाशिक : मोगल नगरमध्ये व्यापाऱ्याने जाळुन घेतले; उपचारादरम्यान मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नवीन नाशिक | प्रतिनिधी

येथील मोगल नगर परिसरातील  उदयानाजवळ एका  व्यापाऱ्याने जाळून घेण्याचा प्रकार घडला. या घटनेत व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील नगर परिसरात राहणारे ब्रिजलाल  नेहफुलाल केशरवाणी ( वय ५१ )  यांनी काल गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोगल नगर भागातील मोगल उदयान जवळ असलेल्या खड्डयात बसुन स्वतःला जाळुन घेतले.

जळाल्यानंतर त्याने स्वतः आरडाओरड केली. यानंतर परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करून बोलावले.

संबंधित व्यक्तीस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी हा व्यक्ती जवळपास ८० टक्के भाजला होता. दरम्यान, आज जिल्हा रुग्णालयात या व्यापाऱ्यावर उपचार सुरू असतांना निधन झाले.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मयत ब्रिजलाल यांचा फळ विक्रीचा व्यवसाय होता. याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com